धंगेकरांना तिकीट दिलं आणि पुणे काँग्रेसमध्ये पडली फूट!
22-Mar-2024
Total Views | 122
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातुन महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनीही आपला उमेदवार जाहीर केला आहे. गुरुवारी २१ मार्चला काँग्रेसने आपल्या महाराष्ट्रातील सात उमेदवारांची यादी जाहीर केली. यात पुणे लोकसभेचा समावेश आहे. पुण्यामध्ये काँग्रेसने लोकसभेसाठी आमदार रविंद्र धंगेकर Ravindra Dhangekar यांच्या नावाची घोषणा केली आहे. पण यामुळे आता पुणे काँग्रेसमध्ये उभी फुट पडली आहे.
काँग्रेसने दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत कसबा मतदारसंघातुन निवडुन आलेले आमदार रविंद्र धंगेकर यांच्यावरच लोकसभेसाठीही विश्वास दर्शवला आहे. पण या ठीकाणी २०१९ च्या लोकसभेत निवडणुक लढवलेले मोहन जोशी, जेष्ठ नेते आबा बागुल, बाळासाहेब शिवलकर, या नावांची चर्चा होती.
रविंद्र धंगेकरांना उमेदवारी मिळाल्यानंतर मोहन जोशी यांनी माध्यमांशी बोलताना मी स्वत: त्यांचे नाव सुचवले आहे असं मत व्यक्त केलं भाजपचा पराभव करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. आणि पक्षात कोणतीही नाराजी नाही असंही ते म्हणाले. परंतु पुणे काँग्रेसचे जेष्ठ नेते यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे.
नविन आलेल्यांना तिकीट मिळते आणि ४० वर्षे पक्षाचे काम केलेल्या निष्ठावंतांना विचारतही नाही असा टोला त्यांनी लगावला आहे. आबा बागुल यांनी शुक्रवारी २२ मार्चला शिवदर्शन ई- लर्निंग स्कुल येथे पत्रकार परीषद घेत नाराजी व्यक्त केली आहे. पुण्याची जाहीर झालेली उमेदवारी हा निष्ठावंतांना धक्का आहे. खरंतर ही निष्ठावंतांची हत्या आहे असं ते यावेळी म्हणाले.
पक्षाचे ४० वर्ष काम करणाऱ्यांना तिकीट मिळालं नाही. कसबा विधानसभेच्या पोट निवडणुकीतही बाहेरुन आलेल्यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांनीही आम्ही मेहनत करुन निवडुण आणलं. पण यावेळी इतर जेष्ठ नेते असताना पक्षाने काय निकश लाऊन त्यांना उमेदवारी दिली याबद्दल मी पक्षाला विचारणा करणार आहे असंही ते म्हणाले.
राहुल गांधींनी देशभर भारत जोडो न्याय यात्रा काढली पण पक्षातील निष्ठावंतांना न्याय मिळणार आहे का ? असा सवालही त्यांनी विचारला आहे. मी ६ टर्म नगरसेवक म्हणुन निवडुन आलो आहे. आता लोकसभेला मला संधी होती. पण पक्षाचा निर्णय पाहुन वाईट वाटलं. काल कुठेही आनंद साजरा झाला नाही. असही त्यांनी म्हटलं आहे.