गेम झाला! वसंत तात्यांचं पुढचं पाऊल ठरलं!

    22-Mar-2024
Total Views | 5520
दोन्ही प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार दिल्यानंतर आता पुणे लोकसभेतुन निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक असलेले आणि नुकतेच मनसेला रामराम ठोकलेले वसंत मोरे ( VASANT MORE ) यांनी आपलं पुढचं पाऊल ठरवले आहे.
  
VASANT MORE
 
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातुन महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनीही आपला उमेदवार जाहीर केला आहे. गुरुवारी २१ मार्चला काँग्रेसने आपल्या महाराष्ट्रातील सात उमेदवारांची यादी जाहीर केली. यात पुणे लोकसभेचा समावेश आहे. दोनही प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार दिल्यानंतर आता पुणे लोकसभेतुन निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक असलेले आणि नुकतेच मनसेला रामराम ठोकलेले वसंत मोरे ( VASANT MORE ) यांनी आपलं पुढचं पाऊल ठरवले आहे. 
 
वसंत मोरेंनी पुणे लोकसभा मतदारसंघातुन अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. काहीही झाले तरी पुण्यातुन मी निवडणुक लढवणारच असे वसंत मोरेंनी यापुर्वींच स्पष्ट केले होते. आता त्यांनी अपक्ष निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातुन महायुतीने भाजपचे मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी घोषीत केली आहे. तर महाविकास आघाडीने काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे.
 
 
वसंत मोरेंनी मनसे सोडल्यानंतर महाविकास आघाडीकडुन तिकीट मिळावे यासाठी विशेष प्रयत्न केले होते. त्यांना अनेक पक्षांकडुन प्रवेशाची ऑफर देखिल मिळाली होती. पण पुणे लोकसभेची जागा काँग्रेसची असल्याने वसंत मोरेंनी काँग्रेसकडुन उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न केले होते.
 
त्यासाठी त्यांनी मागिल लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी, पुर्वी मनसे मध्ये त्यांचे सहकारी राहीलेले आणि आता काँग्रेसचे आमदार असलेले रविंद्र धंगेकर आणि पुण्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांची त्यांनी भेट घेतल्याचेही सांगितले होते. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.
 
 
काँग्रेसने दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत कसबा मतदारसंघातुन निवडुन आलेले आमदार रविंद्र धंगेकर यांच्यावरच लोकसभेसाठीही विश्वास दर्शवला आहे. कोणत्याही पक्षाकडुन उमेदवारी मिळण्याची चिन्हे नसल्याने आता वसंत मोरंनी अपक्ष निवडणुक लढवण्याच निर्णय घेतला आहे.
वसंत मोरेंनी पक्ष सोडल्यानंतर त्यांचे सहकारी मनसे नेते अविनाश जाधव यांनी एक सुचक पोस्ट करत वसंत मोरेंना उत्तर ही दिले होते. आपल्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट करत त्यांनी हत्तीवरुन फिरणाऱ्या राजाची गोष्ट सांगितली होती. रोज हत्तीवरुन फिरणाऱ्या राजाच्या हत्तीला असेच वाटत असते की लोक त्याला पाहात आहेत आणि त्याची प्रशंसा करत आहेत. असा त्या गोष्टीचा आशय होता.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121