मौलवी नसीमला जन्मठेपेची शिक्षा, पीडितेला ५ महिन्यात न्याय!

    14-Mar-2024
Total Views | 65
rape case news

जयपुर :
राजस्थानमधील कोटा येथे मशिदीत अल्पवयीन मुलावर बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालयाने मौलवीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. नसीम खान असे २३ वर्षीय मौलवीचे नाव असून तो मूळचा हरियाणातील पलवलचा रहिवासी आहे. न्यायालयाने नसीमला २१ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. शिक्षा सुनावल्यानंतर न्यायाधीशांनी पीडितेसाठी एक कविताही वाचून दाखवली. ही शिक्षा दि. १३ मार्च रोजी जाहिर केली.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २२ ऑक्टोबर २०२३ ची आहे. इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या १० वर्षाच्या निष्पाप मुलीच्या काकांनी बुधडीत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. फिर्यादीत त्याने म्हटले आहे की, पीडित मुलगी ३ वाजता धार्मिक शिक्षण घेण्यासाठी आणि अरबी शिकण्यासाठी मशिदीत गेली होती. हरियाणातील पलवल येथे राहणारा नसीम खान या मशिदीत मौलवी म्हणून काम करायचा. दरम्यान मौलवींनी मुलीला निर्जन खोलीत नेले आणि तिथे त्यांने मुलीवर अत्याचार केला. मुलगी रडायला लागल्यावर नसीमने यासंबधी काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन तिला गप्प केले.

मात्र, मुलीने घरी येऊन सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी मौलवीवर पॉक्सो कायद्यानुसार आणि आयपीसीच्या कलम ३७७ आणि ५०६ अंतर्गत कारवाई केली. आरोपी मौलवीला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले. कोर्टात या प्रकरणाची सुनावणी जवळपास ५ महिने चालली. सरकारी वकील ललित कुमार शर्मा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, पोलिसांनी अवघ्या १४ दिवसांत तपास पूर्ण केला आणि न्यायलयात तपाची माहिती सादर केली. या माहितीत २४ कागदपत्रांसह ११ साक्षीदारांचे जबाबही नोंदवण्यात आले.

बचाव पक्षाच्या वकिलाने आपल्या अशिलाला निर्दोष घोषित केले. मात्र, कोर्टाने फिर्यादीने सादर केलेले पुरावे खात्रीशीर मानले. फिर्यादी पक्षाने नसीमला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. कोटा जिल्ह्यातील पोस्को कोर्ट क्रमांक ३ मध्ये न्यायाधीश दीपक दुबे यांनी अखेर आरोपी मौलवीला अखेरच्या श्वासापर्यंत तुरुंगात राहण्याची आणि २१ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. शिक्षा सुनावल्यानंतर मौलवी नसीम तुरुंगात जात असताना तोंड लपवत होता.शिक्षा सुनावल्यानंतर न्यायमूर्तींनी मशिदीत घृणास्पद कृत्य करणाऱ्या मौलवी आणि पीडितेवर कवितेतून भाष्य केले.



अग्रलेख
जरुर वाचा
विकसित भारताचा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी कांदिवली पूर्व विधानसभेचे भाजपाचे कार्यकर्ते सज्ज आहेत! आमदार अतुल भातखळकर यांनी व्यक्त केला विश्वास

विकसित भारताचा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी कांदिवली पूर्व विधानसभेचे भाजपाचे कार्यकर्ते सज्ज आहेत! आमदार अतुल भातखळकर यांनी व्यक्त केला विश्वास

नरेंद्र मोदीजींच्या विकसित भारताचा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र काम करणे हेच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे ध्याय आहे असे उदगार कांदिवली पूर्व विधानसभेचे आमदार अतुल भातखळकर यांनी कांदिवली पूर्व विधानसभेत आयोजित विकसित भारत संकल्प सभेच्या उदघाटनाची वेळेस काढले. विकसित भारत संकल्प सभेस कांदिवली पूर्व विधानसभेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी अत्यंत उत्साहात मोठ्यासंखेने उपस्थित होते. नरेंद्र मोदीजींच्या ११ वर्षांच्या दूरदर्शी नेतृत्वात भारत गरिबीवर यशस्वीपणे मात करतो आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121