दिल्ली पुन्हा वायू प्रदूषणाच्या विळख्यात

    09-Jun-2025
Total Views |

Delhi air pollution 
 
नवी दिल्ली : वायू प्रदूषणात वाढ झाल्याने शनिवारपासून दिल्ली-एनसीआरमध्ये श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती योजनेचा पहिला टप्पा लागू झाला आहे. ‘केंद्रीय वायू गुणवत्ता व्यवस्थापन आयोगा’च्या उपसमितीनेदेखील लोकांना नागरिक सनद स्वीकारण्यास सांगितले आहे.
 
दिल्लीचा एक्युआय 209 नोंदवण्यात आला. ग्रेप-1 लागू झाल्यानंतर, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये कोळसा आणि लाकडाच्या वापरावर पूर्णपणे बंदी असेल. समितीने म्हटले आहे की, जोरदार वार्‍यात उडणार्‍या धुळीमुळे प्रदूषण वाढले आहे. ग्रेप-1 उपायांतर्गत, जुन्या पेट्रोल आणि बीएस-4 डिझेल वाहनांवर कडक देखरेख केली जाईल. कचराकुंडीतून घनकचरा, बांधकाम कचरा आणि धोकादायक कचरा नियमितपणे उचलण्याची खात्री करावी लागेल.