मुंबई: इंडस अँप स्टोअर या फोन पे च्या नव्या उपक्रमाला भरघोस पाठिंबा मिळत आहे. एकेकाळी गुगल प्ले स्टोअरच्या मक्तेदारी आह्वान देण्यासाठी फोन पे कडून ' इंडस प्ले स्टोअर ' लाँच करण्यात आले होते. तीन दिवसात १ लाख लोकांनी एप्लिकेशन्स डाऊनलोड केल्याचे समोर आले आहे. भारताने स्वदेशात तंत्रज्ञानाची निर्मिती करण्यासाठी भर दिल्यानंतर आता इंडस स्मार्टफोन धारकांसाठी विविध अँप आणत ते गुगल प्ले प्रमाणे यातून हवे ते एप्लिकेशन्स डाऊनलोड करू शकणार आहेत.
याविषयी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना, इंडस अँप स्टोअरचे प्रणेते आकाश डोंगरे यांनी, ' तीन दिवसात १ लाख डाऊनलोड हे भारतातील लोकल प्ले स्टोअरची स्विकारयता वाढल्याचे प्रतिक असून ग्राहकांच्या विविध गरजा लक्षात घेत या अँपस्टोअरमुळे डेव्हलपर कम्युनिटीलाही चालना मिळेल' असे विधान केले होते.
भारतीय स्मार्टफोन युजर्सचा नव्या गरजा लक्षात घेत आवश्यक सुविधांसह या अँपचे अनावरण करण्यात आले होते. गुगल प्लेला आव्हान देण्यासाठी प्रथम वर्ष अँप डेव्हलपरसाठी नोंदणीकृत शुल्क आकारले जाणार नसल्याचे प्रसारमाध्यमांनी याआधी सांगितले होते. १२ भाषेतील झिरो कमिशन मॉडेलवर या अँपची प्रणाली बनली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते इंडस अँपस्टोअरचे अनावरण करण्यात आले होते.