निलेश चव्हाणला ७ जूनपर्यंत पोलिस कोठडी, तर हगवणे पितापुत्रांना...; सुनावणीत काय घडलं?

    03-Jun-2025
Total Views |
 
Nilesh Chavan
 
पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण याला वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी ७ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या पितापुत्रांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
 
मंगळवार, ३ जून रोजी याप्रकरणाची सुनावणी पार पडली. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे हिने सासरच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, याप्रकरणात तिचे सासरे राजेंद्र हगवणे, सासू लता हगवणे, दीर सुशील हगवणे, नणंद करीश्मा हगवणे, नवरा शशांक हगवणे आणि निलेश चव्हाण या सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
 
हे वाचलंत का? -  संजय राऊतांएवढी दलाली आजपर्यंत कुणीही केली नाही! उद्धवजींनी आवरलं नाही तर...; मंत्री गिरीश महाजनांचा घणाघात
 
दरम्यान, मंगळवारी राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे आणि निलेश चव्हाण या तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी निलेश चव्हाणला ७ जूनपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. वैष्णवी हगवणेच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी त्याला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. निलेश चव्हाणच्या घरात लता हगवणे, करीश्मा हगवणे आणि शशांक हगवणे या तिघांचे मोबाईल सापडले होते. त्यामुळे निलेशचे आणि या तिघांचे काय संबंध आहे हे तपासण्यासाठी ही पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
 
हगवणे पितापुत्रांना न्यायालयीन कोठडी!
 
दुसरीकडे, राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांनादेखील न्यायालयात हजर करण्यात आले होते. दरम्यान, यावेळी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.