शोभायात्रेवर हल्ला करणाऱ्या १६ कट्टरपंथीयांना एनआयएकडून अटक!
27-Feb-2024
Total Views | 118
कोलकाता : पश्चिम बंगालमधील रामनवमी हिंसाचार प्रकरणाच्या तपासादरम्यान राष्ट्रीय तपास यंत्रणेने १६ जणांना अटक केली आहे. एनआयए इंडियाने आपल्या वेबसाइटवर एक प्रेस रिलीज जारी करून ही माहिती दिली आहे. त्यात एनआयएने सांगितले की, रामनवमीच्या दिवशी कटाचा भाग म्हणून शोभा यात्रेवर झालेल्या जातीय हल्ल्याप्रकरणी १६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
तपासादरम्यान सापडलेल्या पुराव्यांच्या आधारे ही अटक करण्यात आली आहे. व्हिडिओमधून फुटेज काढण्यात आले. संपूर्ण प्रकरण दि. ३० मार्च २०२३ चे आहे. उत्तर दिनाजपूरच्या दालखोला येथे रामनवमीच्या दिवशी शोभा यात्रा काढली जात असताना एका समाजाचे लोक तेथे आले आणि त्यांनी शोभा यात्रेत सहभागी झालेल्या लोकांवर हल्ला केला.
याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला १६२ जणांवर गुन्हा दाखल केला होता. नंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दि. २७ एप्रिल २०२३ रोजी हे प्रकरण एनआयएकडे वर्ग करण्यात आले. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर एनआयएने सांगितले की त्यांनी आता १६ जणांना अटक केली आहे.
अफरोज आलम, मोहम्मद अश्रफ, मोहम्मद इम्तियाज आलम, मोहम्मद इरफान आलम, कैसर, मोहम्मद फरीद आलम, मोहम्मद फुरकान आलम, मोहम्मद पप्पू, मोहम्मद सुलेमान, मोहम्मद सरजान, मोहम्मद नुरुल हुडा, वसीम आर्य, मोहम्मद सलाउद्दीन, मोहम्मद सलाउद्दीन अशी या लोकांची नावे आहेत.