नेपाळ पुन्हा 'हिंदू राष्ट्र' होणार?

    20-Feb-2024
Total Views | 212
 Nepal
 
काठमांडू : नेपाळला 'हिंदू राष्ट्र' बनवण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे. या मागणीसाठी सोमवारी, दि. १९ फेब्रुवारी २०२४ गोदावरी, ललितपूर येथे सर्वसाधारण समितीची बैठकही सुरू झाली आहे. या बैठकीचे नेतृत्व नेपाळी काँग्रेसचे खासदार आणि केंद्रीय समितीचे सदस्य शंकर भंडारी करत आहेत. नेपाळला पुन्हा ‘वैदिक सनातन हिंदु राष्ट्रा’चा दर्जा कसा देता येईल, यावर या बैठकीत चर्चा होत आहे.
 
द काठमांडूच्या वृत्तानुसार, या संदर्भात नेपाळच्या २२ केंद्रीय कार्य समित्यांनी गेल्या शुक्रवारी, १६ फेब्रुवारी २०२४ पक्षासमोर हिंदू राष्ट्र निर्माण करण्याची मागणी केली होती. त्यानंतर १७ फेब्रुवारीला ही मोहीम ४ पानी डॉजियरसह सार्वजनिक करण्यात आली. भंडारी यांनी हा मुद्दा मांडण्यासाठी नेपाळी काँग्रेस नेत्यांकडे पाठिंबा मागितला आहे.
 
शंकर भंडारी म्हणाले की, “हा मुद्दा मांडण्यासाठी आम्ही पक्ष नेतृत्वावर दबाव आणू. पक्षाचे अध्यक्ष शेर बहादूर देबा यांनी हा मुद्दा सकारात्मक घेतला आहे. त्यांच्याशिवाय सीपीएम-यूएमएल आणि सीपीएनचे नेतेही या मोहिमेला पाठिंबा देण्यास तयार आहेत. ही केवळ मोहीम नाही, राष्ट्र उभारणीसाठी ही एक महत्त्वाची मोहीम आहे."
 
एकीकडे नेपाळला हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी अनेक राजकारणी एकत्र उभे असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसचे काही नेते या मुद्द्याशी सहमत नसल्याचीही माहिती आहे. शुक्रवारी पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा मुद्दा फेटाळण्यात आला. यावर बोलताना नेपाळी काँग्रेसचे नेते भंडारी म्हणाले की, "आम्ही इतर पक्ष आणि समुदायांशीही या विषयावर चर्चा करणार आहोत."
 
नेपाळ हे आधी राजेशाही होते. त्यासोबतच नेपाळ जगातील एकमेव हिंदू राष्ट्र होते. पण, तिथे डाव्यांची सत्ता आल्यानंतर नेपाळला धर्मनिरपेक्ष राज्य म्हणून घोषीत केले. नेपाळला पुन्हा एकदा हिंदू राष्ट्र करण्याची मागणी जोर धरत आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
मरीआई म्हसोबांच्या भक्तिपंथी रक्षणकर्ते ; कुंचीकोरवे कैकाडींचा अस्मितेचा जागर

मरीआई म्हसोबांच्या भक्तिपंथी रक्षणकर्ते ; कुंचीकोरवे कैकाडींचा अस्मितेचा जागर

कुंचीकोरवे कैकाडी समाजाची ‘आखाडी जत्रा’ ही केवळ धार्मिक परंपरा नसून, समाजाच्या अस्मितेचा, श्रद्धेचा आणि सांस्कृतिक सातत्याचा जिवंत पुरावा आहे. संत कैकाडी महाराज यांची शिकवण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यातील योगदानाची परंपरा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन हा समाज सुसंस्कृत, जागरूक आणि समर्पित वाटचाल करीत आहे. हा विशेष लेख या परंपरेचा आणि समाजाच्या सांस्कृतिक-सामाजिक प्रवासाचा साक्षीदार ठरत, त्या अखंड परंपरेच्या गौरवाचा दस्तऐवज ठरावा, हाच उद्देश...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121