नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशनात पहिल्या दोन दिवसातच वादळी घडामोडी घडल्या आहेत. त्याचवेळी काँग्रेससह विरोधी पक्षांना चर्चेत नव्हे तर गदारोळातच रस असल्याचे दिसून आले आहे.
संसदेचे पावसाळी अधिवेशन अपेक्षेप्रमाणेच वादळी ठरले आहे. अधिवेशनाच्या पहिल्यास दिवशी जगदीप धनखड यांनी अनपेक्षितपणे उपराष्ट्रपतीपदाता राजीनामा दिला आहे. या राजीनाम्याचे पडसाद बराच काळ उमटत राहणार आहेत. त्याचप्रमाणे विरोधी पक्षांची ऑपरेशन सिंदूरवर सविस्तर चर्चेची मागणी केंद्र सरकारने मान्य केली. लोकसभेत १६ तर राज्यसभेत ९ तास असे एकूण २५ तासांची चर्चा होणार असल्याचेही कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे.
त्यानंतर विरोधी पक्षांनी मंगळवारी बिहारमधील मतदारयादी पुनरिक्षणावर (एसआयआर) चर्चेची मागणी करून गदारोळ घातला. त्यावर लोकसभेत केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांचे हे दुटप्पी धोरण उघड केले. ते म्हणाले, कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्याचे निश्चित झाले आहे. मात्र, आता विरोधक नव्या मुद्द्यावर चर्चेची मागणी करून गदारोळ करत आहेत. एकाचवेळी सर्व मुद्द्यांवर चर्चा करणे शक्य नसतानाही जाणीवपूर्वक असे केले जात असल्याचा आरोपही रिजिजू यांनी यावेळी केला आहे.