"तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांना..." देवेंद्र फडणवीसांचे शरद पवारांना प्रतिउत्तर

    08-Dec-2024
Total Views | 31

pawar fadnavis

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीला चांगलाच धक्का बसला आहे. हा पराभवाचा धक्का पचवता न आल्यामुळे आता ईव्हीएमवर शंका घेणे, महायुतीला बदनाम करण्याचा काम सध्या सुरू आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या ५०जागा मिळाल्या तर दुसरीकडे महायुतीने २३१ जागा जिंकल्या. अशातच शरद पवार यांनी मतदानाच्या आकडेवारीवर शंका घेतली आहे. यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रतिउत्तर दिले आहे.
 
आपल्या X हँडलवर प्रतिक्रीया व्यक्त करताना फडणवीस म्हणाले " श्री शरद पवार साहेब आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका" जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा ? यावर भाष्य करताना फडणवीसांनी लोकसभेच्या मतदानाची आकडेवारी शरद पवारांसमोर ठेवली. २०२४च्या लोकसभेत भारतीय जनता पक्षाला १,४९,१३,९१४ इतकी मतं मिळाली आणि भाजपच्या ९ जागा निवडून आल्या. तर दुसऱ्याबाजूला काँग्रेसला मात्र, ९६,४१,८५६ मतं मिळाली परंतु काँग्रेसच्या १३ जागा निवडून आल्या. शिवसेनेला ७३,७७,६७४ मतं मिळाली आणि शिवसेनेच्या ७ जागा निवडून आल्या तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी-शरद पवार गटाला ५८, ५१,१६६ मतं मिळाली आणि ८ जागा निवडून आल्या. या व्यतिरिक्त फडणवीसांनी २०१९च्या लोकसभेची आकडेवारीचा सुद्धा दाखला फडणवीसांनी दिला."२०१९च्या लोकसभेत काँग्रेसला ८७,९२,२३७, मतं मिळाली होती आणि १ जागा त्यांनी मिळवली. तर तत्तकालीन राष्ट्रवादीला ८३,८७,३६३ मतं होती, तर त्यांच्या ४ जागा निवडून आल्या होत्या.

पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल असा सल्ला सुद्धा फडणवीसांनी दिला. त्याच बरोबर तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल अशी अपेक्षा आहे" असे मत फडणवीसांनी व्यक्त केले आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121