पवारांचा खोटारडेपणा म्हणजे संविधानाचा अपमान!

चन्द्रशेखर बावनकुळे यांची टीका

    08-Dec-2024
Total Views | 52
Bawankule and Pawar

मुंबई : शरद पवार यांचा मी सन्मान करतो. त्यांना दीर्घ राजकीय अनुभव आहे, परंतु त्यांनी या वयामध्ये अशा प्रकारचा खोटारडेपणा करणे, जनतेला कन्फ्युज करणे अयोग्य आहे. एक प्रकारे ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा अपमान आहे, अशी परखड टिका भाजपाचे ( BJP ) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

राज्यात झालेला त्यांनी पराभव स्वीकारला पाहिजे, असे सांगून बावनकुळे म्हणाले, जेव्हा पराभव स्वीकारता येत नाही तेव्हा जनतेला कन्फ्युज करण्यासाठी व आपलं अपयश लपवण्याचं काम ते करत असून, जनतेने तर विधानसभामध्ये दाखवून दिले म्हणून ईव्हीएम मशीनवर दोष देऊन पुन्हा आपलं अपयश लपवण्याचे पाप पवार करत आहेत.

विधान भवन परिसरात बावनकुळे माध्यमांशी बोलताना म्हणाले, विधानसभेमधील त्यांचा अत्यंत मोठा पराभव झाला आहे. जनतेने त्यांना नाकारले म्हणून आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पराभवाची भीती असल्यामुळे आपले जनमत वाचवण्याकरिता शरद पवार पुन्हा प्रयत्न करत आहेत आणि मारकडवाडीमध्ये आलेली जी लोक आहेत ती पवार यांची कार्यकर्तेमंडळी आहेत. मारकडवाडीतील जनता त्यात कुठे आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्र नौटंकीला कंटाळला!

मला वाटतं जनतेला सगळ समजले आहे .महाराष्ट्र या नौटंकी ला कंटाळलेला आहे. महाराष्ट्र हा विकासाच्या बाजूने आहे. महाराष्ट्राला महायुतीकडून अपेक्षा आहे आणि महायुतीचे सरकार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र प्रचंड ताकदवान बनणार आहेत.

ईव्हीएम विजेते राजीनामे द्या!

उत्तम जानकर म्हणत आहेत की त्यांची राजीनामा देण्याची तयारी आहे, या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले, असे असेल तर मग महाविकास आघाडीचे जे जे लोक ईव्हीएम मशीनवर निवडून आले आहेत त्या सर्वांनी राजीनामा दिले पाहिजे.खोटारडेपणा करण्यासाठी असा उद्योग सुरू केला आहे . लोकसभेला आम्हाला मोठ्या प्रमाणात अपयश मिळालेलं तर आम्ही ईव्हीएमला दोष दिले नाही तर आम्ही आमच्या चुका दुरुस्त केल्या.लोकसभेच्या पराभवातून आम्ही शिकलो आणि त्यातून आम्ही पुढे गेलो; त्यामुळे पवारांनीही पराभवातून शिकले पाहिजे, असे माझेच नाही तर महाराष्ट्रातील जनतेलाही वाटते.

विधानसभा सदस्यत्वाची शपथ

भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज, रविवारी विधानभवनात विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. ते यापूर्वी तीन वेळा विधानसभा सदस्य होते. तसेच २०१४ ते २०१९ या काळात महाराष्ट्राचे ऊर्जा व उत्पादन शुल्कमंत्री होते. मागील तीन वर्षे ते नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदासंघातून विधान परिषद सदस्य आहेत.

अग्रलेख
जरुर वाचा
राज्याची विजनिर्मिती क्षमता ६,४५० मेगावॅटने वाढणार

राज्याची विजनिर्मिती क्षमता ६,४५० मेगावॅटने वाढणार

मुख्यमंत्र्यांच्या ऐतिहासिक करार; ३१ हजार ९५५ कोटींची गुंतवणूक, १५ हजार रोजगार संधी महाराष्ट्राच्या उदंचन जलविद्युत प्रकल्प (पंप स्टोरेज) क्षेत्राला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जलसंपदा विभागाने मंगळवारी चार महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केले. या करारांमुळे नवीकरणीय ऊर्जा निर्मितीसह औद्योगिक आणि सामाजिक विकासाला गती मिळणार आहे. महाराष्ट्र हे पंप स्टोरेज प्रकल्पात देशात अग्रणी ठरले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. या प्रकल्पांमुळे ६ हजार ४५० मेगावॅट वीजनिर्मिती, ..

जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, की घेतला? - चर्चांना उधाण; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, रोहित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगले

जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, की घेतला? - चर्चांना उधाण; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, रोहित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगले

स्थानिक स्वराज्य संस्थांचा बिगुल वाजला असताना, शरद पवारांनी अचानक प्रदेशाध्यक्ष बदलल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ७ वर्षे एकहाती पक्ष सांभाळणाऱ्या जयंत पाटलांनी अचानक राजीनामा द्यावा आणि तो शरद पवारांनी स्वीकारावा, इतक्यापुरती ही घटना मर्यादीत नाही. त्यामुळे हा राजीनामा खरोखरच स्वेच्छेने दिला गेला की पक्षातील गटबाजीमुळे त्यांना हटवण्यात आले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दुसरीकडे, शशिकांत शिंदे यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडली असली, तरी रोहित पवार आणि समर्थकांत भलती नाराजी पसरल्या..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121