मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Mahakay Damroo in Mahakumbh) उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे दि. १३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या महाकुंभासाठी धर्म, अध्यात्म आणि संस्कृतीशी संबंधित विविध कलाकृती तयार करण्यात आल्या आहेत. याठिकाणी एक महाकाय डमरू सुद्धा तयार होत आहे. महाकुंभ परिसरापासून जवळच उभारण्यात आलेला तीन टन वजनाचा महाकाय डमरू येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. महादेवाची नगरी काशी येथून महाकुंभ परिसरात प्रवेश करण्याच्या मार्गावर झुशी येथे रस्त्याच्या मधोमध महाकाय डमरू बसविण्यात आला आहे.
हे वाचलंत का? : अबब! १५१ फूट उंच 'त्रिशूल'; प्रयागराजच्या महाकुंभातील विशेष आकर्षण
हा डमरू कांस्य आणि इतर धातूंपासून बनवण्यात आला आहे. डमरूची रुंदी तेरा फूट आणि उंची आठ फूट आहे. ज्या भागावर डमरू बसविण्यात आला आहे, ते धरल्यास डमरूची उंची साधारण वीस फूट होईल. गाझियाबादच्या एका कंपनीने महाकाय डमरू तयार केला आहे. डमरू तयार करण्यासाठी दोन डझन कारागीरांच्या पथकाने रात्रंदिवस मेहनत घेतल्याची माहिती आहे.