चिथावणीखोरांना अभय नाही! न्यायालयाने फेटाळली झुबेरची याचिका

    03-Dec-2024
Total Views | 71

zuber 2

लखनऊ : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत असणारा मोहम्मद जुबेर आता कायद्याच्या कचाट्यात चांगलाच अडकल्याचे दिसून आले आहे. ३ डिसेंबर रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी आणि प्रशांत कुमार यांच्या खंडपीठाने तथाकथित फॅक्ट-चेकर' मोहम्मद झुबेर यांच्या अटकेपासून संरक्षण मिळावण्यासाठीच्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला.
 
भारतीय न्याय संहितेच्या कलम १५२ अंतर्गत भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता याला हानी पोहोचवण्याचा गुन्हा केल्याचा आरोप जुबेर याच्यावर करण्यात आला आहे. यती नरसिंहानंद सरस्वती फाउंडेशनच्या सरचिटणीस, उदिता त्यागी यांनी झुबेर याच्या विरोधात ही तक्रार दाखल केली. त्यागी यांनी माध्यमांना दिलेल्या म्हणण्यानुसार, जुबेरने ३ ऑक्टोबर रोजी नरसिंहानंद यांची एक जुनी व्हिडिओ क्लिप हिंसाचार भडकवण्याच्या उद्देशाने पोस्ट केली होती. प्रेषित मुहम्मद यांच्यावरील कथित वादग्रस्त टिपण्णीचा फेरफार केलेला व्हिडिओ पोस्ट करून झुबेरने पुजारींविरुद्ध अतिरेकी विचार भडकावल्याचा आरोपही जुबेरवर करण्यत आला. डासना देवी मंडी इथे चिथवणीखोर भाषणं केल्याप्रकरणी असदुद्दीन ओवेसी, अर्शद मदनी आणि जुबेर यांच्याविरोधी तक्रार दाखल करण्यात आली होती. सदर प्रकरणानंतर डासना देवीच्या मंदिरावर काही कट्टरपंथीयांनी हल्ला चढवला होता. यातील काहींनी हिंदू नावं धारण करण्याचा कावा रचला होता. परंतु पोलिसांनी या बद्दलची सत्यता उघडकीस आणली आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
भारतीय जनता पार्टी द्वारे शासकीय दाखले शिबिर संपन्न

भारतीय जनता पार्टी द्वारे शासकीय दाखले शिबिर संपन्न

वसई विरार शहर महापालिका क्षेत्रातील दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विविध शासकीय दाखल्यांची अत्यंत गरज भासत असते. त्यासाठी त्यांना व त्यांच्या पालकांना शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. वसई तहसीलदार ऑफिसला जाणे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शक्य होत नसल्याने ही गैरसोय टाळण्यासाठी भारतीय जनता पक्षाद्वारे वसई तहसील कार्यालयाकडील उत्पन्न दाखले, अधिवास दाखले, क्रिमिलेअर दाखले, ज्येष्ठ नागरिक दाखले, रेशन कार्ड ऑनलाइन करून घेणे अशा विविध कामकाजाचे शिबिर शनिवार १४ जून रोजी कातकरीपाडा, चंदनसार..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121