कॅनडामध्ये खलिस्तान्यांची भारतविरोधी आगपाखड सुरूच!

कॅनडा सरकारवर कॉन्सुलर शिबिरे बंद करण्याची नामुष्की

    01-Dec-2024
Total Views | 16

khalistani protestors

ओटावा : कॅनडामधील खलिस्तानी कट्टरपंथीयांचा उन्माद शांत होण्याचे नाव घेत नाहीये. ३० नोव्हेंबर रोजी खलिस्तान समर्थकांनी कॅनडातील ओंटारियो इथल्या लक्ष्मी नारायण मंदिराबाहेर भारत सरकारच्या विरोधात निदर्शने केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात असंविधानिक भाषा वापरत खलिस्तानी समर्थकांनी उच्छाद मांडला. न्यायालयाच्या आदेशाने अशा निदर्शांवर बंदी असतान सुद्धा ही निर्दशनं केली गेली. कॅनडामधील भारतीय दूतावास कॅनडामध्ये राहणाऱ्या वृद्ध भारतीय नागरिकांना जीवन प्रमाणपत्र देऊन मदत करण्यासाठी वार्षिक कॉन्सुलर शिबिरे घेत असतो, अशाच एका शिबीरादरम्यान, खलिस्तानींनी मंदिराबाहेर निषेध केला.

पेनशन मिळवण्यासाठी जीवनप्रमाणपत्रं ही अत्यंत आवश्यक गोष्ट असते. खलिस्तानी कट्टरपंथीयांनी वेळोवेळी या शिबीरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. सुरक्षेशी निगडीत समस्यांमुळे अनेक शिबीरं रद्द करण्यात आली होती. खलिस्तानी आंदोलक मंदिराबाहेर झेंडे फडकवताना, घोषणाबाजी करताना आणि उपस्थितांना धमकावण्यासाठी साउंड सिस्टिमचा वापर करताना दिसले होते. ही शिबिरे हिंदू, शीख, मुस्लिम आणि ख्रिश्चनांसह विविध धार्मिक पार्श्वभूमीतील वृद्ध पेन्शनधारकांना सेवा देतात, मात्र हीच शिबिरे आता राजकीय शत्रुत्वाचे केंद्रबिंदू बनले आहेत. या शिबिरांभोवती वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, ओंटारियो मधील सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला असून आंदोलकांना शिबिरादरम्यान मंदिराच्या १०० -मीटरच्या परिघात एकत्र येण्यास मनाई करणारा आदेश जारी केला आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव शिबिरे रद्द
या शिबिरांना लक्ष्य केल्याने कॅनडातील भारतीय राजदूतांच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली होती. यात घडलेली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे नोव्हेंबरच्या सुरुवातीस, ब्रॅम्प्टनमधील हिंदू सभा मंदिरातील कॉन्सुलर कॅम्पला खलिस्तान समर्थक घटकांच्या हिंसक हल्ल्याचा सामना करावा लागला. या हिंसाचारामुळे अनेकांना अटक करण्यात आली. या घटनेनंतर, भारतीय दूतावासांनी कॅनेडियन अधिका-यांकडून अपुऱ्या सुरक्षेचा हवाला देऊन ओकविले येथील वैष्णो देवी मंदिरातील एका शिबिरासह अनेक शिबिरे रद्द केली.शिवाय, हिंसाचाराच्या धमक्यांमुळे काही ठिकाणी कॉन्सुलर शिबिरे स्थलांतरित करावी लागली किंवा पूर्णपणे रद्द करावी लागल्याची नोंद करण्यात आली आहे.

 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121