मुंब्रा कळव्यातुन टोरन्ट पॉवर बंद करणार - नजीब मुल्ला

    09-Nov-2024
Total Views | 45
Najeeb Mulla

ठाणे : कळवा - मुंब्रा विधानसभा क्षेत्रात गेले तीन टर्म आमदारकी भुषविणाऱ्या जितेंद्र आव्हाडांना टोरन्ट पॉवरचा झटका बसण्याची चिन्हे आहेत. गेल्या चार वर्षापासुन कळवा - मुंब्रावासियांचा विरोध असलेल्या टोरन्ट पॉवर कंपनीला बंद करण्याचे आश्वासन महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी (अजितदादा गट) काँग्रेसचे उमेदवार नजीब मुल्ला ( Najeeb Mulla ) यांनी दिले आहे. शुक्रवारी मुंब्य्रात मुल्ला यांची प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी मतदारांनी फटाक्यांची आतिषबाजी करुन नजीब मुल्ला यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी बोलताना त्यांनी मुंब्रा कळव्यातुन टोरन्ट पॉवर बंद करणार असल्याचे मत व्यक्त केले.

कळवा-मुंब्रा-शीळ परिसरात साडेतीन लाखावर वीज ग्राहक असून मार्च २०२० साली टोरंट पॉवर कंपनीने फ्रँचाईझी म्हणून या भागाचा कारभार हाती घेतला आहे. टोरंट आल्यापासुन येथील नागरीकांचा टोरंटला विरोध सुरू आहे. इथल्या स्थानिक आमदारामुळेच मुंब्र्यात टोरंट आल्याचे विधी मंडळात स्पष्ट झाल्याचा आरोप मध्यंतरी नजीब मुल्ला यांनी केला होता. आता हाच टोरन्टचा मुद्दा आव्हाडांना त्रासदायक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. शुक्रवारी कळवा - मुंब्रा विधानसभेचे राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांनी, मुंब्र्यात प्रचार रॅली काढली. यावेळी, मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातील विकास कामांबाबत विद्यमान आमदार बोलत नाही. मी निवडून आल्यावर मुंब्रा व कळवा येथील रहिवाशांना त्रासदायक टोरन्ट पॉवर तत्काळ बंद करणार असल्याचे मत नजीब मुल्ला यांनी व्यक्त केले.

मफतलाल तलाव छटपुजेसाठी सुसज्ज करणार!

कळवा - मुंब्रा मधुन निवडून आल्यावर पुढच्या वर्षी मफतलाल तलाव छटपूजेसाठी सर्व सुविधांनी सुसज्ज असेल, असे जाहीर आश्वासन महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नजीब मुल्ला यांनी दिले आहे. कळवा पूर्वेकडील छटपुजेच्या कार्यक्रमाला आले असता मफतलाल तलावात सोयीसुविधा नसल्याने छटपूजा करताना नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास आले होते.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121