हिंदू शिक्षकांनो राजीनामा द्या! बांगलादेश मधील अराजकता कायम
19-Nov-2024
Total Views | 78
धाका : बांगलादेश मध्ये महम्मद युनुस यांचे सरकार आल्यानंतर सुद्धा तेथील अस्थिरता कमी व्हायचं नाव घेत नाहीये. अल्पसंख्यांक आणि त्यातही हिंदू समाजाच्या लोकांवर होणारे अन्याय अत्याचार दिवसागणिक वाढतच चालले आहेत. अशातच आता बांगलादेश मधील शहिद स्मृती डिग्री कॉलेजच्या हिंदू प्राध्यपकांना तसेच प्राचार्यांना बळजबरी करत राजीनामा देण्यास सांगितले आहे. इस्लामी मूलत्तववादी आणि बांगलादेशी सैन्याच्या आदेशावर हा राजीनामा घेण्याता आली आहे. माध्यमांवर या संदर्भातील फोटो सुद्धा व्हायरल झाला आहे.
प्राचार्य दुर्लवानंद बाराई यांच्यासह भौतिकशास्त्राचे शिक्षक बिमल पांडे आणि शिक्षक लिटन दत्ता यांना देशातील अशांततेच्या पार्श्वभूमीवर आपली पदं सोडण्यास सांगितली गेली आहेत. शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर मोठ्या संख्येने हिंदू शिक्षकांना नोकरी सोडण्यास भाग पाडले गेले. बरीशालमधील बाकेरगंज सरकारी महाविद्यालयाच्या प्राचार्या शुक्ला राणी हलदर यांच्या बाबतीत सुद्धा हीच गोष्ट घडली. बांगलादेशी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांनी आणि बाहेरच्यो लोकांनी त्यांच्या कार्यालयावर हल्ला केला आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
१८ ऑगस्ट रोजी, अझीमपूर सरकारी मुलींची शाळा आणि महाविद्यालयातील सुमारे ५० विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापिका गीतांजली बरुआ यांना घेरले व त्यांचा राजीनामा मागितला. सहाय्यक मुख्याध्यापक गौतम चंद्र पॉल आणि शारीरिक शिक्षण शिक्षिका शहनाजा अख्तर यांचा देखील राजीनामा मागण्यात आला. या वर्षी ऑगस्टमध्ये हसिना यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीगचे सरकार पडल्यानंतर बांगलादेशमधील हिंदू, बौद्ध आणि ख्रिश्चन समुदायाच्या सदस्यांविरुद्ध हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या. या घटना रोखण्यात मुहम्मद युनूस यांचे सरकार अपयशी ठरल्याचे स्पष्ट दिसून आले आहे.