संजय शिरसाट मनोज जरांगेंच्या भेटीला!

    19-Nov-2024
Total Views | 73

Sanjay Shirsat
 
 जालना : राज्यात सर्वत्र निवडणूकीचे वातावरण असताना शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी मंगळवार, १९ नोव्हेंबर रोजी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगेंची भेट घेतली. या भेटीनंतर शिरसाटांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
संजय शिरसाट म्हणाले की, "मनोज जरांगेंची प्रकृती ठीक नसल्याने मी त्यांची सदिच्छा भेट घेतली. जरांगे पाटील आणि माझा संबंध अत्यंत स्नेहपूर्वक आणि मैत्रीचा आहे. त्यामुळे आपल्या माणसाला भेटण्यासाठी मी माझा आजचा वेळ दिला. राजकारणाच्या व्यतिरिक्तसुद्धा बोलण्यासाठी अनेक विषय असतात. त्यावर आम्ही चर्चा केली. मित्रत्वात बाकी विषयावर आम्ही चर्चा करत नाही. त्यांचा राजकारणाशी संबंध नसल्याने ते जास्त खोलात जात नाहीत. परंतू, एकंदरीत महाराष्ट्रातील परिस्थितीबद्दल आम्ही एकमेकांशी चर्चा केली. एक मित्र म्हणून मी नेहमीच त्यांना आवर्जून भेटत असतो. आज वेळ होता त्यामुळे त्यांची भेट घेतली," असे त्यांनी सांगितले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121