प्रविणभाऊ दरेकर : एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आणि प्रतिभावान नेतृत्व

    13-Oct-2024
Total Views | 23

nitin bankar
 
आज भाजपचे विधान परिषदेतील गटनेते प्रविणजी दरेकर यांचा वाढदिवस म्हणजे, खर्‍या अर्थाने आम्हा कार्यकर्त्यांचा आनंद सोहळाच. त्याला कारणही तसेच आहे. आदरणीय प्रविणजी म्हणजे कार्यकर्ता तयार करण्याचा कारखाना असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही. गेल्या अनेक वर्षांत प्रविणभाऊंनी आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते नुसते तयार केले नाहीत, तर त्यांना आर्थिक व राजकीय मुख्य प्रवाहात आणून त्यांचे उत्थान करण्याचे कामही त्यांनी केले. म्हणून, तर जिथे जाईल तिथे प्रविणजी यांच्या भोवती कार्यकर्त्यांचा गराडा कायम असतो.
 
गेली १८-२० वर्षे आ. प्रविणभाऊंबरोबर त्यांचा कार्यकर्ता म्हणून काम करण्याची संधी मिळाली, म्हणून मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. त्यामुळे त्यांच्या सामाजिक, सहकारी व राजकीय जीवनाचे अनेक पैलू मला जवळून अनुभवता आले. त्यांच्या अवतीभवती त्यांच्या परिसस्पर्शाने जीवनाचे सोने झालेले असंख्य कार्यकर्ते, नेते समाजात दिसतात.
 
सहकार क्षेत्रामध्ये तर आ. प्रविणजींनी आपल्या कल्पक बुद्धीच्या जोरावर अनेक यशाची शिखरे गाठली आहेत. सातत्याने नाविन्याचा शोध घेण्याची वृत्ती, सर्वसमावेशक विचारसरणी, धाडसीपणा, अत्युच्च आकलन शक्तीच्या जोरावर तर त्यांनी सहकार क्षेत्रात अनेक अशक्य गोष्टी शक्य करून दाखविल्या आहेत. मजूर चळवळीतील साधा कार्यकर्ता म्हणून सुरूवात केलेल्या या व्यक्तीचा सहकारातील प्रवास, तर अत्यंत अचंबित करणारा आहे. गिरणी कामगारांना घरे देणे, ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ अंतर्गत ५० हजार महिलांचे शून्य पैशात खाते उघडणे, माथाडी कामगारांना घरे देणे, मुंबई शहरातील मोडकळीस आलेल्या इमारतींचा स्वयंपुनर्विकास इत्यादींसारख्या नवनवीन योजना बँकेत राबवून समाजातील आर्थिक, शोषित, पीडितांचे आर्थिक उत्थान करण्याचे पवित्र कार्य ते गेली अनेक वर्षे करत आहेत.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी प्रविणभाऊंचे नेतृत्वगुण, अभ्यासूवृत्ती, बेधडकपणा, आक्रमकता इत्यादी गुण अचूक हेरले. रत्नपारखीला रत्नाची खरी पारख असते. आपल्या अंगभूत कौशल्याच्या जोरावर आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर प्रविणभाऊंनी उभा महाराष्ट्र पिंजून काढला. जिथे अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बलात्कार, नैसर्गिक आपत्ती असेल तिथे प्रविणभाऊ सर्वात अगोदर पोहोचले.
 
अशा या सर्वमान्य लोकमान्य नेतृत्वास आई जगदंबा दीर्घ व निरोगी आयुष्य देवो. त्यांच्या हातून देव, देश, धर्म, राज्य, समाजाची अशीच उत्तरोत्तर सेवा घडो आणि माझ्यासारख्या अनेक सामान्य कार्यकर्त्यांचे जीवन अधिकाधिक उजळो, या सदिच्छांसह प्रविणभाऊंना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!
 
नितीन बनकर,
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.चे संचालक, भाजप भायखळा विधानसभेचे अध्यक्ष
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121