मुंबई : (Department of Animal Husbandry and Dairying) पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाची पुनर्रचना करून या विभागाचे नामकरण ‘पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मस्त्यव्यवसाय’ विभाग असे करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. पुनर्रचनेनंतर पशूसंवर्धन आयुक्तालय व दुग्धव्यवसाय आयुक्तालयाचे एकत्रीकरण करून पुनर्रचनेनंतर आयुक्त पशूसंवर्धन व दुग्धव्यवसाय, असे या पदाचे नाव राहील.
राज्यातील ३५१ तालुक्यांमध्ये तालुका पशूसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय अधिकारी कार्यालय सुरू करण्यात येईल. त्याचप्रमाणे १६९ तालुक्यांत तालुका लघू पशूवैद्यकीय सर्वचिकित्सालय सुरू करण्यात येतील. राज्यातील २ हजार, ८४१ पशू वैद्यकीय श्रेणी दोन दवाखान्यांचे श्रेणी एक दवाखान्यात श्रेणीवाढ करण्यात येईल. त्याशिवाय १२ हजार, २२२ नियमित आणि कंत्राटी तत्वावरील ३ हजार, ३३० पदांच्या वेतनासाठी १ हजार, ६८१ कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली.