मुंबई : संजय राऊत यांची वैचारिक सुंता झाल्यामुळे काँग्रेससोबत जाऊन हलाला करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे, असा घणाघात भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी केला आहे. शुक्रवार, १५ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेत त्यांनी राऊत यांना प्रत्युत्तर दिले.
नवनाथ बन म्हणाले की, "संजय राऊत यांनी यापुढे बोलताना आणि शिव्या देताना थोडा विचार करावा. संजय राऊत यांची वैचारिक सुंता झाली आहे का? हा माझा सवाल आहे. त्यांची वैचारिक सुंता झाल्यामुळे काँग्रेससोबत जाऊन हलाला करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. आज महाराष्ट्रात झालेल्या उद्धव ठाकरे गटाच्या अवस्थेला संजय राऊत जबाबदार आहेत. हिदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून संजय राऊत यांनी वैचारिक सुंता केलेली आहे. मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसून, पत्राचाळीत मराठी माणसांची घरे लाटून त्यांनी वैचारिक सुंता केलेली आहे. विकास करणे हा भारतीय जनता पार्टीचा पुरुषार्थ असतो. एखाद्या महिलेला शिव्या देणे हा भाजपाचा पुरुषार्थ नाही. संजय राऊत यांचा पुरुषार्थ शिव्या देण्यात आहे. एखाद्या मराठी माणसाला त्याची सुंता झाली आहे का? तो नपुसंक आहे का? असा सवाल विचारताना संजय राऊतांनी दहा वेळा विचार करावा,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, “नवनाथ बन हा कच्च्या गुरुचा नाही, तर सच्च्या गुरुचा चेला आहे. ज्या आधुनिक अभिमन्यूने महाविकास आघाडीचे चक्रव्यूह भेदला त्याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी सच्चा शिपाई आहे. संजय राऊतांनी हे लक्षात ठेवावे. ज्या पद्धतीने ते भाषा वापरतात हे त्यांना शोभते का?” असा सवालही त्यांनी केला.
जागा आणि वेळ ठरवा“संजय राऊत तुम्ही हॉस्पीटल, डॉक्टर, ठिकाण, वेळ ठरवा. मी तुमच्यासोबत येऊन माझी वैद्यकीय तपासणी करायला तयार आहे. पण संजय राऊत यांनीसुद्धा माझ्यासोबत येऊन आपली वैद्यकीय तपासणी करावी. दोघांच्याही वैद्यकीय तपासणीचे प्रमाणपत्र महाराष्ट्राला दाखवावे. संजय राऊत हे आव्हान स्वीकारत नसतील तर त्यांचीच सुंता झाली आहे, हे महाराष्ट्राला कळून जाईल,” असे अवाहनही त्यांनी दिले.
२०१४ पूर्वी देश खड्ड्यात होता“२०१४ नंतर महाराष्ट्र खड्ड्यात गेला असे संजय राऊत म्हणतात. काय भाषा आहे ही? २०१४ नंतर या देशाला नवीन वळण मिळाले. २०१४ पूर्वी देश खड्ड्यात होता. परंतू, पंतप्रधान मोदीजींनी विकसित भारत करण्यासाठी प्रयत्न केले. संजय राऊतांनी वारकरी संप्रदायाचा, नाथ परंपरेचा अपमान केला आहे. त्यांच्याकडून सातत्याने अश्लील भाषा वापरली जाते. पण महाराष्ट्रातील जनता सुज्ञ असून जनता तुमची भाषा सहन करणार नाही,” असेही नवनाथ बन म्हणाले.