'प्रभू श्रीराम मांसाहारी...' जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त विधान!

    03-Jan-2024
Total Views | 117
Jitendra Awhad on shri ram


शिर्डी
: राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट)चे शिर्डी येथे शिबिर आयोजित केले गेले होते. या शिबिरात बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी राम मंदिराच्या उद्धाटनावर बोलताना एक वादग्रस्त विधान केले आहे. आव्हाड म्हणाले की, राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे. शिकार करून खाणार राम आमचा आहे. आज सगळे आम्हाला शाकाहारी बनवायला जातात पण आम्ही रामाचा आदर्श पाळतोय. त्यामुळे राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता. रामाने १४ वर्ष वनवास भोगला, मग शाकाहारी कसा असेल? असा सवाल ही त्यांनी यावेळी उपस्थित केला. त्यावर आता सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
 
दरम्यान “मी कोणतेही वादग्रस्त विधान केलेले नाही. मी माझ्या विधानावर ठाम आहे. श्रीरामाला शाकाहारी बनविले जात आहे. पण वनवासात असताना ते काही मेथीची भाजी खात होते का? या देशातील ८० टक्के लोक मांसाहारी असून ते राम भक्त आहेत”, असा दावा ही आव्हाडांनी केला.

अत्यंत मुर्खपणाचे विधान आहे. वाल्मिकी रामायणापासून कुठल्याही चौदा रामायणामध्ये प्रभू रामचंद्र मांसाहारी होते, असा उल्लेख नाही. उलट प्रभू रामचंद्र फळ,मूळ, कंदमूळ खाऊन चौदा वर्ष वनवासात राहिलेत, असा उल्लेख आहे.- महंत सुधीर दास पुजारी

आव्हाडांचे मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. त्यांना उपचाराची गरज आहे. आणि असे विधान करून ते तमान हिंदूंची भावना दुखावत आहेत. त्यांना धर्मशास्त्राचं कोणतेही ज्ञान नाही. त्यामुळे त्यांनी नाशिकला येऊन प्रभू रामचंद्र या विषयावर शास्त्रार्थ करावा आणि ज्ञान सिद्ध करावे, असे आव्हान आम्ही देतो.- महंत अनिकेत शास्त्री


प्रभू श्रीरामचंद्रांच अस्तित्वच नाकारणारी जितेंद्र आव्हाडांसारखी मंडळी आता देशभरात सर्वत्र प्रभू श्रीरामाच वातावरण बघून बिथरली आहेत.जितेंद्र आव्हाडांची विकृत मानसिकता आणि श्रीरामाचा अपमान करण्याचा प्रयत्न जनतेने अनेक वेळा अनुभवला आहे.उभ्या देशाची अस्मिता असणाऱ्या प्रभू श्रीरामाच्या बाबतीत जर अशी विकृत वक्तव्य केली तर जनता तुम्हाला जोडे मारल्याशिवाय राहणार नाही.विक्रांत पाटील,सरचिटणीस, भारतीय जनता पार्टी,महाराष्ट्र


शरद पवार आणि त्यांचा पक्षचा स्तर इतका खालवला की, त्यांची मजल प्रभू श्रीरामांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्यापर्यत गेली आहे. तुमच्या दीड-दमडीच्या राजकारणासाठी आणि मुल्ल्यांच्या दाढ्या कुरवाळण्यासाठी तुम्ही कुठल्या थराला जाताय. शरद पवार तुमच्या या चेल्या-चपाट्यांना सुधरायला सांगा अन्यथा तुमच्या शेवटच्या काळात तुम्हाला वाईट दिवस यापेक्षा जास्त भोगायला लागतील. -आचार्य तुषार भोसले, भाजप आध्यत्मिक आघाडी प्रमुख



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121