संजय राऊतांच्या भावाला ईडीची नोटीस! काय आहे प्रकरण?
25-Jan-2024
Total Views | 55
मुंबई : उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांना बुधवारी ईडीने नोटीस बजावली आहे. कोरोना काळातील खिचडी घोटाळ्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच संदीप राऊत यांना पुढील आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कोरोना काळात झालेल्या वेगवेगळ्या घोटाळ्यांप्रकरणी उबाठा गटाचे नेते सध्या ईडीच्या रडारवर आहेत. उबाठाचे आमदार रवींद्र वायकर यांच्यावर मुंबई महापालिकेच्या जागेवर ५०० कोटींच्या फाईव्ह स्टार हॉटेलचे बांधकाम केल्याचा आरोप आहे. तसेच किशोरी पेडणेकर यांच्यावर कोरोना काळातील बॉडीबॅग घोटाळ्याचा आरोप असून त्यांची चौकशी सुरु आहे. दरम्यान, आता कोरोना काळातील खिचडी घोटाळ्यात संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊत यांचेदेखील नाव पुढे आले आहे.