पुणे : उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालापुर्वी पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला गेल्या आहेत. गणरायाच्या आशिर्वादाने आज १० जानेवीराला होणाऱ्या आमदार अपात्रता निकाल त्यांच्या बाजूने सकारात्मक लागेल अशी आशा त्यांना आहे.
दर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आजच्या निकाला पेक्षा आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आणि विजयाची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी गणरायाने आम्हाले आशिर्वाद द्यावे अस साकड त्यांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी शिवसेना आमदार अपात्रता निकालावरुन विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्री यांच्यावर टिकाही केली.
सुषमा अंधारे पुर्वीपासूनच हिंदुविरोधी वक्तव्यांसाठी चर्चेत राहील्या आहेत. प्रभू श्रीरामचंद्र आणि माता सितेबद्दल अर्वाच भाषेत त्यांची वक्तव्यही सोशल मिडीयावर वायरल झाली होती. त्याचबरोबर नवरात्रीमध्ये महीला जो नऊ दिवसांचा उपवास करतात त्यावरही त्यांनी देवीबद्दल बोलत विचित्र भाषा वापरत व हावभाव करत टिका केली होती. त्यामुळे हिंदुविरोधी वक्तव्ये करणाऱ्या सुषमा अंधारे आज दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला कशा असा प्रश्न जनतेकडून उपस्थीत केला जात आहे.