आमदार अपात्रता प्रकरणाचा काऊंटडाऊन सुरू; १४ सप्टेंबरला मॅरेथॉन सुनावणी

    09-Sep-2023
Total Views | 57
MLA Disqualification Case Hearing On Supreme Court

मुंबई :
शिवसेनेत पडलेली फूट आणि खरी शिवसेना कुणाची या मुद्द्यावरून सेनेच्या दोन्ही गटात मोठा संघर्ष पाहायला मिळाला होता. उबाठा गट आणि शिंदे सेनेतील या संघर्षातून उद्भवलेल्या आमदार अपात्रता प्रकरणाच्या कारवाईचा काऊंटडाऊन सुरू झाला असून येत्या १४ सप्टेंबरला मॅरेथॉन सुनावणी होणार आहे.

प्राप्त माहितीनुसार, दि. १४ सप्टेंबर रोजी विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात ही सुनावणी होणार आहे. उबाठा गट आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या सर्व आमदारांना बोलावून एकाच दिवशी सुनावणी घेण्यात येणार आहे. यावेळी दोन्ही गटाचे आमदार अधिवेशनानंतर पहिल्यांदाच आमनेसामने येणार असून वादी व प्रतिवादी असलेल्या आमदारांना पुरावे सादर करत आपली मांडण्याची संधी दिली जाणार आहे.

३४ याचिकांवर स्वतंत्र सुनावणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सुनावणीवेळी एकूण ३४ याचिकांवर स्वतंत्र सुनावणी घेण्यात येणार आहे. प्रत्येक याचिकेची वेगळी सुनावणी होताना संबंधित आमदारांना त्यावेळी बोलावले जाणार आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121