
Explainer - कोण आहेत उदय कोटक ? नुकताच राजीनामा दिलेल्या कोटक महिंद्राचे अध्यक्ष उदय कोटक यांच्याबद्दल जाणून घ्या !
अचानक कोटक महिंद्रा बँकेचे अध्यक्ष उदय कोटक यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याने सगळ्यांचेच डोळे उंचावले. अत्यंत कष्टाने ही बँक त्यांनी उभी केली. आजच्या घडीला मार्केट value नुसार ३ क्रमांकाची बँक ही ओळखली जाते. १९८५ साली १०००० रुपयांच्या भांडवलात उदय कोटक यांनी ३ कर्मचाऱ्यांसह ही बँक सुरू केली होती. आज बँकेची उलाढाल ३०० कोटी किंवा त्याहून अधिक आहे. विश्वास गुणवत्ता या मूलभूत तत्वावर स्थापन झालेली ही बँक आताची Corporate प्रकारच्या सुविधा देणारी बँक, कंपनी आहे.
' भागभांडवलधारक यांच्यासाठी आम्ही मूल्य तयार केले आहे.१९८५ साली सुरू झालेली बँकेची आजची उलाढाल ३०० कोटींहून अधिक आहे. मला खात्री आहे ही भारतीय संस्था भारताच्या सामाजिक आर्थिक महासत्ता बनविण्यात महत्वाची भूमिका बजावत राहील. असे त्यांनी भावूकपणे X वर म्हटले आहे '.
उदय कोटक यांनी यशस्वीपणे ३८ वर्ष या बँकेची सुत्र सांभाळली. त्यांनी Economic Times वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत आम्ही ३ ही कंपनीचे स्तंभ राजीनामा देत असलो तरी हे कंपनीच्या पाया मजबूत असल्याचे लक्षण आहे असे मुलाखतीत नमूद केले आहे.
सुरूवातीला कोटक बँकेने छोट्यातून सुरूवात करत आर्थिक सेवा देणाऱ्या गोल्डमन सचस या अमेरिकन इनव्हेसमेंट बँके बरोबर हातमिळवणी केली. २१ नोव्हेंबर २०१४ ला ING Vaisya Bank चे अधिग्रहण त्यांनी कोटक महिंद्रा बँकेत त्यांनी करून घेतले.
कोण आहेत उदय कोटक व त्यांची सुरूवात ?
१५ मार्च १९५९ ला उदय कोटक यांचा जन्म झाला. गुजराती कुटुंबात जन्मलेल्या कोटक यांनी पुढे मुंबईतील sydenham college मधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर जमनालाल बजाज मधून व्यवस्थापनातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यांचा कारकीर्दीत त्यांना यशस्वी बँकर म्हणून अनेक पुरस्कार मिळाले आहेत. India Today ने भारतातील 50 शक्तीशाली व्यक्तींपैकी ८ व्या क्रमांकाचे स्थान त्यांना दिले आहे. उदय कोटक व बोर्ड ऑफ डायरेक्टरनी राजीनामा दिला आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत कोटक यांचा कार्यकाल पूर्ण होईल. या संबंधी कायदेशीर प्रक्रिया होऊन नजीकच्या काळात नवीन व्यक्तीची या मोठ्या पदावर नियुक्ती होईल. २०२१ चा नवीन तरतूदीनुसार कंपनीचे भागभांडवलधारक असल्यास १२ वर्षांहून अधिक काळ कंपनीच्या सर्वोच्च पदावर राहता येत नाही.