मुंबई : चलनातून २००० रुपयांच्या नोटा जमा करण्याची आज शेवटची संधी होती. त्यामुळे मुदत संपण्यापूर्वी लवकरात लवकर २००० रुपयांच्या नोटा बदलण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, आता ही मुदत एका आठवड्याने वाढवण्यात आली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २००० रुपयांच्या नोटा जमा करण्याची तारीख ७ ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे अजूनपर्यंत जे लोक २००० रुपयांच्या नोटा बदलू शकले नाहीत त्यांना दिलासा मिळाला आहे. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, २००० सुमारे ९३% नोटा प्राप्त झाल्या आहेत. परंतु, अद्याप ७% रकमेच्या नोटा बँकेत येणे बाकी आहेत. त्यामुळेच आता ही मुदत वाढवण्यात आली आहे.
सरकारने मे महिन्यात २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. या नोटा बँकांमध्ये जमा करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. आज या मुदतीचा शेवटचा दिवस होता. परंतु, आता ही मुदत ७ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.