मुंबई, भारताने अग्नि ५ या आंतरखंडीय मारक क्षमता असलेल्या अण्वस्र वाहक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. ओडिशाच्या ए पी जे अब्दुल कलाम बेटावर संरक्षण दलाकडून ही चाचणी घेण्यात आली. अग्नी ५ च्या विविध चाचण्यांद्वारे अग्नि पाच क्षेपणास्त्र आधीच सरंक्षण दलांच्या सेवेमध्ये दाखल झाले आहे.
भारताने गेल्या दशकभरामध्ये सातत्याने प्रयत्नपूर्वक सरंक्षण सिद्धतेमध्ये वाढ केली आहे. यामध्ये विविध क्षेपणास्त्र, ड्रोन तंत्रज्ञान व अन्य आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश आहे. यामध्ये आता अग्नि ५ या क्षेपणास्त्राचीही भर पडली आहे. भारताच्या अग्नि या क्षेपणास्त्रांच्या मालिकेमधील ५ प्रकराचे क्षेपणास्त्र असलेल्या अग्नि ५ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी भारतीय सैन्य दलाने घेतली. त्यामुळे भारताच्या ताफ्यामध्ये अग्नि १ ते अग्नि ५ अशी पाच क्षेपणास्त्रे झाली आहेत. अग्नि ५ या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ५ हजार किमीपेक्षा अधिक असून, दीड टन वजनाएवढी स्फोटकांचे वहन हे क्षेपणास्त्र करू शकते. अग्नी ५ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे संपूर्ण चीन भारताच्या मारक क्षमतेच्या टप्प्यामध्ये आला आहे. याशिवय यूरोप आणि आफ्रिकेचा काही भाग देखील येतो. या मिसाईलमध्ये मल्टीपल इंडिपेंडेंटी टार्गेटेबल री-एंट्री वेईकल्स तंत्रज्ञानाचा समावेश आहे. म्हणजे हे क्षेपणास्त्र एकदा प्रक्षेपित केल्यानंतर अनेक लक्ष्यांवर हल्ला करु शकते. अग्नि ५ क्षेपणास्त्रामध्ये प्रगत मल्टीपल इंडिपेंडेंटली- टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, यामुळे क्षेपणास्त्र एकाचवेळी अनेक वॉरहेड कॅरी करु शकतात. अग्नि -५ क्षेपणास्त्राचा वेग आवाजाच्या २४ पट आहे. या क्षेपणास्त्राची प्रक्षेपण यंत्रणा कॅनिस्टर तंत्रज्ञानावर आधारित असल्यामुळे या क्षेपणास्त्राची वाहतूक करणे सोपे झाले आहे.
भारताच्या ताफ्यातील अग्नि क्षेपणास्त्र आणि तपशीलक्षेपणास्त्र लांबी वजन पल्ला
अग्नि १ १५ मी १२,००० किलो ७००-१२०० किमी
अग्नि २ २० मी १७,००० किलो २०००-३००० किमी
अग्नि ३ १६.७ मी ४८,३०० किलो ३०००-३५०० किमी
अग्नि ४ २० मी १७,००० किलो ३०००-४००० किमी
अग्नि ५ १७.५ मी ५०,००० किलो ५०००-८००० किमी
अग्नि ६च्या निर्मितीवर काम सुरु..!
अग्नी ६ ही भारताची या क्षेत्रातील अत्युच्च झेप ठरेल. हे क्षेपणास्त्र एकाचवेळी अनेक अण्वस्त्रे किंवा बॉम्ब यांची वाहतूक करण्यास सक्षम असेल , अशी माहिती डीआरडीओचे प्रमुख व्ही के सारस्वत यांनी दिली. हे क्षेपणस्त्र प्राथमिक अवस्थेत असून, सध्या त्याची रचना कशी असेल यावर त्याचे काम झाले आहे असेही सारस्वत यांनी म्हटले आहे.