पद्म पुरस्कारांच्या शिफारशीसाठी राज्य सरकारची समिती!
सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार समितीचे अध्यक्ष
05-Aug-2023
Total Views | 72
मुंबई : पद्म पुरस्कारांच्या नावांची शिफारस करण्यासाठी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत दिलीप वळसे पाटील , दादा भुसे, चंद्रकांत पाटील, धनंजय मुंडे, उदय सामंत आणि अप्पर मुख्य सचिव यांचा समावेश करण्यात आला आहे. आता ही समिती शासनाकडे विविध माध्यमातून प्राप्त झालेल्या नावांची छाननी करुन केंद्र पाठवणार आहे. केंद्र सरकारला पद्म पुरस्कारांसाठी ही समिती मदत करेल.
त्यातील पद्म पुरस्कार हे भारत सरकारकडून देण्यात येणाऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक आहेत. प्रत्येक वर्षी 26 जानेवारीच्या पू्र्वसंध्येला हे पुरस्कार जाहीर करण्यात येतात. तर मार्च आणि एप्रिल महिन्यांमध्ये या पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. या पुरस्कारांचे देशामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे.