झोमॅटोला २३-२४ चा तिमाहीत 'इतका' निव्वळ नफा
नवी दिल्ली - प्रसिद्ध फूड एग्रीगेटर झोमॅटो ला आर्थिक वर्ष २३-२४ चा पहिल्या तिमाहीत २ कोटी रूपयांचा निव्वळ नफा झाला आहे.त्यामुळे शेअर बाजारात झोमॅटो चे शेअर भाव १३.७ टक्यांनी वाढून ९८ रुपये प्रति शेअर गेले. झोमॅटोचे शेअर भाव गेल्या एक महिन्यापासून २६ टक्क्याने वाढले असून तिमाही चांगली ग्रथ कंपनीला मिळाली आहे. मागील तिमाहीत झोमॅटोला तोटा मागील आर्थिक वर्षात तोटा सहन करावा लागला होता.
झोमॅटोने २०२१ ला बीएससी,एनएससी मध्ये कंपनीचे लिस्टिंग झाले होते.आयपीओ जाहिर केल्यानंतर शेअर भाव ७६ रुपयांनी लिस्ट केलेले असले तरी ११५ रुपये प्रति शेअर्स विक्रीची नोंद झाली होती.
झोमॅटोचे मुख्य वित्तीय अधिकारी अक्षांत गोयल म्हणाले,"वास्तविकपणे सांगायचे तर,सप्टेंबरच्या तिमाहीत आम्ही हा टप्पा गाठण्याची अपेक्षा करत होतो आणि आम्ही आमच्या आधीच्या मार्गदर्शनात आशावादी होतो.तथापि,आमच्या व्यवसायातील टीमच्या काही महत्त्वपूर्ण भागांनी आमच्या अपेक्षा पूर्ण केल्या.योजना आणि आमच्या काही उपक्रमांनी आमच्या अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिले."
डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हचा संपानंतर झोमॅटो ला मागील वर्षी मोठा फटका बसला होता.