ख्रिश्चन सफाई कामगारावर ईशनिंदा केल्याचा आरोप; कट्टरपंथीयांनी जाळले चर्च
16-Aug-2023
Total Views | 406
मुंबई : पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक समुदायावरील हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. आता पंजाब प्रांतातील फैसलाबाद जिल्ह्यात अनेक चर्चमध्ये तोडफोड आणि जाळपोळ झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. एका ख्रिश्चन सफाई कामगारावर ईशनिंदा केल्याचा आरोप झाल्यानंतर ही घटना घडली. मुस्लिम जमावाने ख्रिश्चनांना लक्ष्य केले आणि त्यांच्या घरांवरही हल्ले केले.
सैल्व्हेशन आर्मी चर्च, युनायटेड प्रेस्बिटेरियन चर्च, अलाईड फाऊंडेशन चर्च आणि ईसा नगरी भागातील शेहरूनवाला चर्चची तोडफोड करण्यात आली, असे फैसलाबाद जिल्ह्यातील जरनवाला तहसीलचे पाद्री इम्रान भाटी यांनी सांगितले. यासोबतच ईशनिंदा केल्याचा आरोप असलेल्या ख्रिश्चन सफाई कामगाराचे घरही फोडण्यात आले.
या घटनेचे अनेक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये जमावाकडून लोकांवर हल्ला होताना दिसत आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपी ख्रिश्चन सफाई कामगाराविरुद्ध पाकिस्तान दंड संहितेच्या कलम २२९बी (कुराणचा अपमान) आणि २९५सी (प्रेषितांबद्दल अपमानास्पद टिप्पणी) अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.