कोहलीचे इंस्टाग्रामवर २५६ दशलक्ष फॉलोअर्स; एका पोस्टमधून मिळतात इतके कोटी.... !

इंस्टाग्रामवरून कोटींची कमाई करणारा विराट कोहली अव्वल भारतीय

    11-Aug-2023
Total Views | 122
Indian Cricketer Virat Kohli On Top Insta Income

मुंबई :
सोशल मीडियाच्या युगात जास्तीत जास्त फॉलोअर्स वाढवून कमाई करण्याचा कल दिसून येतो. सेलिब्रिटींपासून ते थेट सामान्य जनतेपर्यंत प्रत्येकात ही क्रेझ दिसून येते. परंतु, सोशल मीडियाच्या माध्यमातून कमाई करणाऱ्यांची यादी प्रसिध्द झाली असून यात भारतीय सेलिब्रिटींमध्ये फक्त दोनच व्यक्ती पहिल्या २० जणांच्या यादीत दिसून आलेत. त्यात भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीचा १४वा क्रमांक आहे.

हूपर HQ ने २०२३ ची इंस्टाग्राम रिच लिस्ट प्रसिध्द केली असून यानुसार विराट कोहली एका इंस्टाग्राम पोस्टवरून जवळपास ११.४५ कोटी रुपये कमावतो. तसेच, विराटचे इन्स्टाग्रामवर २५६ दशलक्ष पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. क्रीडा विश्वातील दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सीनंतर भारताच्या विराट कोहलीचा नंबर लागतो. दरम्यान, तिसऱ्या क्रमांकावर अमेरिकन सेलिब्रिटी सेलेना गोमेझ असून तिला एका पोस्टमधून २० कोटींहून अधिक रुपये मिळतात. तर कोहलीनंतर प्रियांका चोप्रा ही दुसरी भारतीय अभिनेत्री असून तिला एका पोस्टमधून ५ कोटींहून अधिक कमाई करते.

तर या यादीत अव्वल स्थानावर पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो असून एका पोस्टमधून तो सुमारे २६.७५ कोटी रुपये कमावतो. तर दुसऱ्या क्रमांकावर अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी असून त्याची कमाई २१.४९ कोटी रुपये असल्याचे जाहीर करण्यात आले आहे,

दरम्यान, भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली इंस्टाग्रामवरून सर्वाधिक कमाई करणारा भारतीय असून एका पोस्टमधून ११ कोटींहून अधिक कमाई करताना दिसतो आहे. तसेच, एक खेळाडू म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून कोटींची कमाई करणारा विराट कोहली एकमेव भारतीय खेळाडू नसून तर तो आशियाई खेळाडूदेखील आहे.

विराट कोहलीने आपल्या अनोख्या क्रिकेटशैलीच्या आधारावर असंख्य चाहते निर्माण केले आहेत. त्याच्या बहारदार फलंदाजीमुळे त्याला 'रनमशीन' कोहली असं संबोधलं जातं. त्यामुळे बॉलीवूड जगतातील नट-नट्यांना मागे टाकून विराट कोहलीने इंस्टाग्रामवरून कोटींची कमाई करणाऱ्या भारतीयांमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.




अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121