
कल्याण : कल्याण विकास फाऊंडेशनच्या अध्यक्षा हेमलता पवार यांनी छत्रपती शिक्षण संस्थेच्या अभिनव विद्यामंदिर पारनाका कल्याण या शाळेतील विद्याथ्र्यासोबत गुरूपौर्णिमा उत्सव साजरा केला. अभिनव शाळेत यंदाच्या वर्षी तब्बल दोनशे नवीन प्रवेश झाले. त्याबद्दल हेमलता पवार यांनी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचा:यांचे भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले आहे.
अभिनव विद्यामंदिरात दोन सत्रत गुरूपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. सकाळच्या सत्रत नवजीवन शाळेच्या माजी शिक्षिका वसुधा जोशी उपस्थित होत्या. प्रार्थना व श्र्लोकांचा दैनंदिन जीवनात कसा सकारत्मक परिणाम होतो यासंदर्भात त्यांनी विद्याथ्र्याना मार्गदर्शन केले. काही कथा ही त्यांनी विद्याथ्र्याना सांगितल्या. तर दुपारच्या सत्रत माजी शिक्षिका सुनंदा कदम या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थी दशेत सदाचार किती महत्त्वाचा असतो याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून त्यांनी विद्याथ्र्याना दत्ताचे श्लोक ही शिकविले.
अभिनव विद्यामंदीर पारनाका कल्याण या शाळेत तब्बल दोनशे नवीन प्रवेश झाले. उन्हाळी सुट्टीच्या दिवसात शाळेतील सर्व शिक्षक कल्याण विभागातील गावोगावी व झोपडपट्टीमध्ये फिरून जे विद्यार्थी शिक्षण घेत नाही अशा विद्याथ्र्याचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. त्याबद्दल कल्याण विकास फाऊंडेशनच्या अध्यक्षा हेमलता पवार यांच्या हस्ते शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा:यांचा भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी भाजपा ठाणो ग्रामीण अध्यक्ष राजाभाऊ पातकर, भाजपा महिला मोर्चा प्रदेश सचिव प्रिया शर्मा, समृध्दी देशपांडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक संपत गिते व पर्यवेक्षक अरूण आवटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
----------------------------------------------------------------