मुंबई : शिवसेनेच्या आमदारांचा प्रलंबित असलेल्या अपात्रतेच्या याचिकांवर तातडीने निर्णय घेण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांना उत्तर देण्यासाठी नोटीस बजाविली होती. तर आता पुन्हा आमदारांचा अपात्रतेचा मुद्दा लांबणीवर गेला आहे.
शिवसेनेच्या 40 आमदारांना मुदतवाढ मिळाली आहे. दोन आठवड्यांची मुदत आमदारांना दिली आहे. खुलासा करण्यासाठी शिंदे गटातील आमदारांना ही शेवटची संधी आहे. पावसाळी अधिवेशनानंतर सुनावणीस सुरुवात होणार आहे. नोटीसीचा खुलासा दिलेल्या आमदारांना पुरावे सादर करावे लागणार आहेत. विधीमंडळातील सुत्रांनी ही माहिती दिली आहे.