बापरे ! जपान भारतात इतक्या येनची गुंतवणूक करणार?
जपान भारतात पाच ट्रिलियन यांची गुंतवणूक करण्यास इच्छुक- ज्योतिरादित्य सिंधिया
नवी दिल्ली : जपानचे अर्थ उद्योग व व्यापार मंत्री निशिमुरा यशुतोशी यांनी नुकताच राजधानी दिल्ली दौरा केला. त्यांनी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची यावेळी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी जपान भारतात ५ ट्रिलियन रूपयांची गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे असे उद्गार याप्रसंगी बोलताना व्यक्त केले.
आमची याविषयी सखोल चर्चा झाली आहे.यावेळी पायाभूत सुविधा, उत्तम विकासाची बांधणी व नव्या तंत्रज्ञानाचा देवाणघेवाण यासाठी भारत जपान या संदर्भात चर्चा झाली. स्टील उद्योगा व्यतिरिक्त इतर औद्योगिक क्षेत्रासाठी जपान येणाऱ्या काळात ५ ट्रिलियन येन इतकी गुंतवणूक करेल अशी चर्चा झाली असे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पीटीआय बोलताना सांगितले.
येणारया काळात भारत जपान मधील गुंतवणुकीसाठी सहयोग पाहणे त्यामुळे औत्सुक्याचे ठरणार आहे.