मुंबई : हिंदी चित्रपसृष्टीचे शहेनशाह अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन वयाची ८० पार केली असली तरी मुख्य भूमिका अजूनही चित्रपटांमध्ये साकारत आहेत. गेली अनेक दशके ते प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. आत्तापर्यंत बिग बी यांनी नायक, खलनायक, वडिल, इतकेच नाही तर मुलगा अभिषेकच्या मुलाच्या भुमिकेत ते दिसले आहेत. दरम्यान आता अमिताभ बच्चन यांच्याबद्दल एक महत्वाची बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित बायोपिक निर्मात्या प्रेरणा अरोरा तयार करण्याच्या तयारीत असून यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची व्यक्तिरेखा अमिताभ बच्चन यांनी साकारावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
झूमने दिलेल्या वृत्तानुसार, प्रेरणाला जेव्हा नरेंद्र मोदींवर चित्रपट का बनवायचा आहे असं विचारलं गेलं तेव्हा ती म्हणाली की ती नरेंद्र मोदींना भारतातील सर्वात 'शक्तिशाली, सुंदर आणि सक्षम' व्यक्ती मानते. नायक म्हणून पंतप्रधानांचे व्यक्तिमत्त्व त्यांना प्रभावित करते. त्यामुळेच आता तिला पंतप्रधानांचं आयुष्य पडद्यावर प्रेक्षकांना दाखवायचं आहे.
या बायोपिकमध्ये ती पंतप्रधान मोदींबद्दल कोणत्या गोष्टी मोठ्या पडद्यावर दाखवेल हे सांगताना म्हणाली, ती या बायोपिकमध्ये पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या जीवनातील अनेक पैलूंचा समावेश करेल. परराष्ट्र धोरण स्वीकारण्यापासून ते आर्थिक विकासापर्यंत, त्यांनी कोविड-19 काळातील त्यांच्या भुमिका आणि यासोबतच पीएम मोदींचे बालपण, राजकीय कारकीर्द ते निवडणूक जिंकण्यापर्यंतचा काळ सगळंच या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटासाठी नायक म्हणून तिला अमिताभ बच्चनच हवे असून ते पडद्यावर पंतप्रधान मोदींची भूमिका उत्तमरीत्या साकारू शकतील असा तिला विश्वास आहे.
आता प्रेरणाची ही इच्छा पुर्ण होणार का? आणि अमिताभ बच्चन ही भूमिका आणि चित्रपट स्वीकारणे का हे पाहणे महत्वाचे असणार आहे. लवकरच बिग बी प्रभास आणि दीपिकाच्या मल्टीस्टारर प्रोजेक्ट के मध्ये दिसणार आहे. यात चित्रपटाचा टिझरही आज रिलिज करण्यात आला आहेत. तसेच, 'घूमर', 'गणपत', 'द उमेश क्रॉनिकल्स', 'बटरफ्लाय' या चित्रपटात देखील बिग बी दिसणार आहेत.