हा तुमचा नाका नाही! १३० कोटी जनता बघतेयं! आप खासदारांना उपराष्ट्रपतींनी झापलं!
21-Jul-2023
Total Views | 117
नवी दिल्ली : पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही संसदेत विरोधकांचा गोंधळ सुरूच होता. राज्यसभेत आपचे खासदार संजय सिंह आणि राघव चढ्ढा यांनी गोंधळ घातला. इतर सदस्यांना बोलू दिले नाही आणि कामकाजात व्यत्यय आणला. यावेळी उपराष्ट्रपती आणि सभागृहाचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी दोघांनाही संसदेत योग्य वर्तवनूक करण्याचा सल्ला दिला.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले की, राज्यसभेला वरिष्ठ सभागृह म्हटले जाते, ते ज्येष्ठांचे घर मानले जाते, त्यामुळे येथे असे वागणे योग्य नाही. या घरात आपण करत असलेली कृत्य १३० कोटींहून अधिक लोक पाहत आहेत. आपल्या वागण्याने आपण चांगले उदाहरण मांडले पाहिजे, जेणेकरून आपली प्रशंसा होईल.
दरम्यान, संजय सिंह आणि राघव चढ्ढा यांनी मध्येच गोंधळ सुरू केला तेव्हा अध्यक्षांनी त्यांना खडसावले की तुम्ही काही वेळ गप्प बसू शकत नाही. ते म्हणाले की, पुन्हा पुन्हा उभे राहून बोलणे ही तुम्हा लोकांची सवय झाली आहे. मी प्रत्येक सदस्याला बोलण्याची संधी देतो पण ही काही नाका नाही.
संजय सिंह आणि राघव चढ्ढा यांनी उपराष्ट्रपतींच्या समजूतीनंतरही गोंधळ सुरूच ठेवला. त्यामुळे नाराज झालेल्या उपराष्ट्रपतींनी दोघांही संविधान वाचण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, तुम्हा लोकांना देशाचे संविधान वाचण्याची गरज आहे. जेणेकरून तुम्हाला संविधान काय आहे आणि काय नाही हे समजेल.