रुग्णाचे विश्लेषण आणि समन्वय

    05-Jun-2023
Total Views | 73
Article On Modern science

माणसामधील रोगाला जर पूर्णपणे बरे करायचे असेल, तर रोगाचा किंवा आजाराची संकल्पना करणे फार महत्त्वाचे आहे. मॉडर्न शास्त्राच्या कल्पनेनुसार रोग म्हणजे रोगाचे नाव व त्याचे निदान होय. म्हणजे एखाद्या हृदयरोग झाला किंवा एखाद्याला संधीवात झाला किंवा एखाद्याला मधुमेह झाला, यापर्यंतच हे निदान होते. आजाराला नाव दिले की, निदान झाले, असे या शास्त्राच्या अनुसार आहे. त्यानुसार प्रत्येक आजाराची गटवारी केली जाते व त्यानुसार प्रत्येक आजारासाठी मग एक स्पेशालिस्ट किंवा तज्ज्ञ डॉक्टर असतो. हा तज्ज्ञ डॉक्टर फक्त एका विशिष्ट आजाराचीच काळजी घेतो. त्याला जर आपण काही दुसरी लक्षणे सांगितली, तर हा तज्ज्ञ सांगतो की ते माझे काम नाही.

तुम्ही दुसर्‍या स्पेशालिस्टकडे जा, असे करुन विविध आजारांची नावनिहाय वर्गवारी करून माणसाला एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी फिरवले जाते. या सर्व प्रकारात वेळ, पैसा जातोच. परंतु, आजार म्हणजे किंवा रोग म्हणजे नक्की कशामुळे झालाय, हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. रोगाच्या नुसत्या result(परिणाम)ला औषधे दिली जातात. cause(मूळ कारण) मात्र बर्‍याचदा तिथेच राहते. म्हणून बहुतेक सर्व आजारांमध्ये रुग्णाला सांगितले जाते की, तुम्हाला आयुष्यभर औषधे घेत राहावी लागणार. याचाच अर्थ असा की, ही औषधे आजाराला मुळापासून नष्ट करू शकत नाहीत, वरचेवर व आयुष्यभर औषधे चालूच ठेवावी लागतात. त्यामुळे त्याचे भयंकर ‘साईडइफेक्टस’किंवा दुष्परिणाम पण भोगावे लागतात. अशा औषधांवर अवलंबून राहिलेल्या लोकांची स्वत:ची प्रतिकारशक्तीच हळूहळू लोप पावते आणि quality life निघून जाते.

उदाहरणार्थ, अस्थमाचा रुग्ण हा या अस्थमांसाठी वर्षानुवर्षे पंप घेत असतो. पंप घेतल्या की, त्याला तात्पुरते बरे वाटते. परत दुसर्‍या दिवशी तसाच त्रास होतो व पंप घ्यावा लागतो. म्हणजेच काय तर या प्रकारच्या औषधांनी रोग हा पूर्ण बरा कधीच होत, फक्त तात्पुरता आराम मात्र मिळतो. याचे मुख्य कारण असे की, आजाराचा किंवा रोगाचा खोलवर जाऊन अभ्यास केलाच गेलेला नसतो. फक्त मधुमेह, अस्थमा अशी आजाराची नावे त्या आजाराला देऊन वैयक्तिकीकरण न करता सर्व रुग्णांना तीच औषधे दिली जातात. यामुळे आजार मुळापासून बरा होतच नाही आणि वर त्या रुग्णांना सांगितले जाते की, आयुष्यभर ही औषधे घ्यावी लागणार. आपल्या शास्त्रामधील त्रुटी हे लोक अशाप्रकारे झाकतात असो जर आजार मुळापासून काढायचा असल्यास ’concept of disease’ चा अभ्यास करणे फार गरजेचे ठरते.

असा अभ्यास जेव्हा केला जात नाही, तेव्हा औषधाची मूळ कल्पना ही आजार हा लोकल प्रॉब्लेम आहे व तो नीट हाताळला तर तो बरा होईल, यावर अवलंबून असते. उदा. मधुमेह म्हणजे स्वादुपिंडातील खीश्रशीं उशश्रश्री मधील बिघाड ‘एविलेप्सी’ म्हणजे मेंदूची बिघडलेली स्थिती तसेच ‘र्‍हुमॅटॉईड आरथ्रापटीस’ म्हणजे शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये झालेला बिघाड अशा पद्धतीने आजाराकडे पाहिले जाते. परंतु, या सर्व संस्थांमध्ये बिघाड का झालाय, हे जाणणे फार महत्त्वाचे असते, त्यालाच म्हणतात Fundamental cause of disease. (क्रमश:)

डॉ. मंदार पाटकर
(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)
अग्रलेख
जरुर वाचा
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांच्या कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखावा आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात लोकसंख्यानिहाय आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करा. नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांची कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखून या कामांना गती द्यावी.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देवून आपले सरकार संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121