‘लव्ह जिहाद’ व्हाया ‘ड्रग्ज जिहाद’ : एक भयानक वास्तव!

    03-Jun-2023   
Total Views |
Love Jihad Via Drugs Jihad Reality

‘लव्ह जिहाद’चा मार्ग ‘ड्रग्ज जिहाद’च्या वाटेवरूनच जातो, नव्हे जी कुणी ‘लव्ह’च्या खोट्या जाळ्यात फसत नाही, तिच्यासाठी किंवा त्याच्यासाठी ‘ड्रग्ज जिहाद’ आहेच आहे. हिंदू कुटुंब, हिंदू समाज नव्हे, संपूर्ण भारतासमोरचा हा एक मोठा प्रश्न आहे. ‘लव्ह जिहाद’ व्हाया ‘ड्रग्ज जिहाद’ व्हाया ‘लस्ट जिहाद’ची परिणीती शेवटी त्या फसलेल्या मुलीच्या नरकयातनायुक्त जगण्यात किंवा क्रूर खुनातच होते. या ‘लव्ह-लस्ट जिहाद’ आणि ‘ड्रग्ज जिहाद’चा संबंध मांडणारा हा लेख. यातील प्रत्येक घटना सत्य आहे. वेळ आली आहे ‘लव्ह जिहाद’ व्हाया ‘ड्रग्ज जिहाद’ची विकृत राक्षसी मानसिकता ओळखून त्यावर कठोर कारवाई करण्याची, त्याला चिरडण्याची!

पोलीस अधिकार्‍याची इयत्ता आठवीत शिकणारी मुलगी. ती अचानक बेशुद्ध पडली. इस्पितळात उपचार सुरू करण्याआधीच ती १४ वर्षांची मुलगी मृत्यू पावली. मात्र, तिचा शवविच्छेदन अहवाल मिळाला आणि तिच्या पोलीस अधिकारी असलेल्या पित्याचीच काय संबंधित सगळ्यांनाच काय करावे हे सुचेनासे झाले. कारण, शवविच्छेदन अहवालात लिहिले होते की, अमली पदार्थाचे प्रमाणाबाहरे सेवन केल्याने तिच्या मेंदूच्या नसा फुटल्या होत्या. तसेच त्या बालिकेवर अनेकदा क्रूर लैंगिक अत्याचार झाला होता. बालिकेच्या शरीराची शब्दातीत हानी झाली होती. घटना आहे केरळमधील आणि ही घटना घडली एप्रिल महिन्यात. पोलिसी कारवाई होईल, गुन्हेगारांपर्यंत पोलीस पोहोचतीलही.

मात्र, केरळमधील बहुसंख्य हिंदू जनतेचे मत आहे की, हा ‘लव्ह जिहाद’ व्हाया ‘ड्रग्ज जिहाद’ आहे. केरळमध्ये हे काही नवीन नाही. या ‘जिहाद’चा मागोवा घेताना काही घटना पाहू. उघडकीस आलेल्या घटना योगायोगाने केरळमधल्याच आहेत. पोलिसांना संशय होता की संबंधित व्यक्ती अमलीपदार्थ विकतो. शाळा, जिम, चहा आणि आईस्क्रिम पार्लर वगैरे ठिकाणी अमलीपदार्थ विकण्याचा त्याचा सैतानी धंदा. मात्र, अशा अट्टल गुन्हेगारांवर पाळत ठेवून त्यांना रंगेहात पकडले गेले, तेव्हा काय वास्तव समोर आले? तर त्याच्यासोबत हिंदू युवती होती आणि ती नशेच्या अमलाखाली होती. अमली पदार्थ तिच्या बॅगेत होते. अमली पदार्थ सेवन कुणी केले होते, तर त्या युवतीने, मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ स्वत:जवळ बाळगत त्या पदार्थांची विक्री करण्यासाठी शाळा किंवा उपहारगृहामध्ये कोण आले होते तर ती हिंदू युवती. त्यामुळे साक्षी-पुराव्यानुसार गुन्हेगार ठरली ही युवती. ही एकच घटना नाही.

टेक्सटाईल मिलमध्ये काम करते म्हणून सांगणारी अक्षया साजी पोलिसांना अशाच प्रकारे सापडली. तिच्यासोबत होता तिचा ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मधील पार्टनर युनूस रझाक. खासगी कार्यालयात काम करणारी २३ वर्षांची शिल्पाही अशीच नार्कोटिक्स पोलीस कारवाईमध्ये सापडली. २७ वर्षांच्या मोहम्मद अल्ताफसोबत तीही ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये होती. तिसरी घटना पवित्रा सोबतची. तिचे ब्युटीपार्लर. अजमलच्या प्रेमाच्या जाळ्यात सापडली. एक दिवशी तीही अमली पदार्थ सेवन करून नशा विकताना सापडली. या तिन्ही घटनांमध्ये हे तिन्ही पुरूष अमली पदार्थांची तस्करी करतात, याची माहिती पोलिसांना होती. सापळा रचून त्यांच्यावर कारवाई करताना त्यांच्यासोबत या मुली सापडल्या. या तिन्ही घटना २०२१ ते २०२३च्या दरम्यानच्या. या घटनांचे विश्लेषण करताना वाटते नक्की काय घडले असेल? तिघीही चांगल्या घरच्या मुली. तिघींच्याही आयुष्यात संबंधित पुरूष आले. या मुलींना ‘रिलॅक्स’ वाटण्यासाठी आणखीन मजा येण्यासाठी अमली पदार्थांची चटक त्यांच्या त्या पार्टनर्सनी लावली. त्या नशेत या मुलींसोबत लैंगिक संबंध प्रस्थापित केले.

सातत्याने लैंगिक संबंध आणि गर्भपात यामुळे मुली घरातल्यांपासून दूर जात, या पुरूषांसोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहू लागल्या. दरम्यानच्या काळात या मुलींचे नोकरी-व्यवसाय सगळे बंद झाले. सगळेच बरबाद झाले. ते पुरूषच त्यांचे आश्रयदाता आणि अन्नदाता झाले. आईवडील, कुटुंब तर तुटलेलेच. त्यातूनच मग या मुली अमली पदार्थ तस्करी आणि विक्री करू लागल्या. नशेच्या त्या इतक्या अधीन झाल्या की काय चांगले, काय वाईट याचे त्यांना साधे भान राहायले नाही. दुसरीकडे असा प्रश्न उपस्थित होतो की, अमली पदार्थांची विक्री करणार्‍या, तस्करी करणार्‍यांना इतके द्राविडी प्राणायाम करण्याची काय गरज? मुलींना फसवा, वेळ घालवा, पैसे खर्च करा, त्यापेक्षा कुणाही थातूरमातूर गुंडांना किंवा नशेखोर व्यक्तीलाही ते सोबत ठेवू शकत होते. मग या मुलीच का? तर यावर काही लोकांचे म्हणणे आहे की, हिंदू वस्तीत आणि हिंदू मुलींमध्ये तसेच हिंदू समाजात या मुली हिंदू म्हणून सहज वावरू शकतात. त्यामुळे या ठिकाणी अमली पदार्थ विकण्याचा मार्ग सुकर होतो. तसेच मुलींना अमली पदार्थांच्या जाळ्यात ओढल्याने त्यांचे शारीरिक शोषण करणे सोपे जाते. त्यांना देहविक्रीच्या नरकधंद्यात ढकलून पैसाही कमावता येतो. तुमच्या समाजाला नशेची लत लावण्यासाठी तुमच्याच मुलींचा वापर केला जातो. तसेच विशिष्ट पंथाचे लोकच या घाणेरड्या धंद्यात गुंतले आहेत, असे पुराव्यासकट म्हणणार्‍या लोकांना उत्तरही देता येते की, बघा तुमच्या समाजातल्या मुलीच यामध्ये आहेत.

नुकतेच महाराष्ट्र सरकाने ‘मिशन ३० दिवस’ हा संकल्प केला आहे. याअंतर्गत ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ हे अभियान सुरू आहे. का? तर गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई पोलिसांनी अमली पदार्थ बाळगल्याबद्दल, तस्करी केल्यासंदर्भात २५४ तक्रारी नोंदवल्या आहेत. याअंतर्गत २६३ लोकांना अटक झाली आहे आणि २.५९ कोटी रूपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. महाराष्ट्र त्यातही राज्यातील मोठ्या शहरांमध्ये अमली पदार्थांचे जाळे चिंताजनकरित्या वाढले आहे. उच्चभ्रू समाजातील मुलींना या जाळ्यात ओढले जातेच. पण, मुंबईतील गरीब, वंचित वस्त्यांमध्येही हे प्रमाण वाढले आहे. याविषयी मी मुंबईतील काही सामाजिक कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यांचे मत जाणून घेतले. चार घरं सोडून एका तरी घरातली अल्पवयीन मुलगी किंवा मुलगा अमली पदार्थांच्या जाळ्यात अडकला आहे. बालकांना नशेचे आदी बनवले जाते. कारण, त्यांच्यामार्फत अमली पदार्थांची विक्री करणे सोपे जाते. चोरी करणे सोपे जाते. तसेच या बालकांना आणि बालिकांना देहविक्री करण्यासही भाग पाडले जाते.

मानखुर्द-गोवंडी असू देत की वरळी-मलबार हिल असू देत की, दहिसर असू दे, मुंबईच्या वस्त्यांमध्ये अमली पदार्थांचा जबरदस्त विळखा पडला आहे. हिंदू आईबाप हिंदुत्व म्हणून मुलांना संस्कार देतात, पण नशेच्या अधीन झालेले निष्पाप पाल्य, बालक नकळत्या वयातच अट्टल गुन्हेगार बनतात. देव-देश-धर्म तर सोडाच, स्वत:च्या आईबापाच्या विरोधात उभे राहतात. काही लोकांचे म्हणणे आहे की, हे सगळे सगळ्यांना माहिती आहे. पण, आपल्याला काय करायचे, हे म्हणत लोक गप्प बसतात, तर काही घाबरून गप्प बसतात. पण, आवाज उठवला जात नाही. इतकेच काय? ज्यावेळी प्रत्यक्ष आपली मुलं- मुली या जाळ्यात सापडले आहे, असे त्यांना समजते, तेव्हाही इज्जत जाईल, तसेच लोक काय म्हणतील, म्हणत ते त्यांच्या मुलामुलींना विरोधही करत नाहीत. हे सत्य आहे. अशा घटना मी स्वत: पाहिलेल्या आहेत. याबाबत काय वाटते, खरंच शब्दच नाहीत! काळीज आता फाटून जाईल असे वाटते!

१५ दिवसांपूर्वी मुंबई उपनगरात एक संपन्न उच्चभ्रू दाम्पत्य भेटले. त्यांची १७ वर्ष आठ महिन्यांची मुलगी वयाच्या बाराव्या वर्षापासून, ती सहावीला असल्यापासूनच कसाईवाड्यातल्या एका मुलाच्या जाळ्यात अडकलेली. अभ्यासात प्रचंड हुशार असलेली आणि अतिशय सुंदर असलेली ही मुलगी तांबारलेल्या डोळ्याच्या आणि फुंकर मारला तर उडून जाईल, अशा त्या मुलासाठी वाट्टेल ते करायला तयार होती. पालकांच्या लक्षात आले की, ती अमली पदार्थांचे सेवन करते. त्या मुलापासून आणि नशेपासून मुलगी दूर राहावी म्हणून या दाम्पत्याने उपनगरातले घर भाड्याने दिले आणि ते बदलापूरला राहायला गेले. एक-दोन महिने ठीक गेले. एकेदिवशी तो मुलगा बदलापूरला त्यांच्या घरापर्यंत पोहोचला. मग तो दररोज येऊ लागला. तिला अडवले तर ती ऐकत नसे आणि मारले तर नशेच्या स्वाधीन असल्याने कितीही मारले तरी तिला काहीच फरक पडत नसे. त्यानंतर काही दिवसांनी मुलगी पुन्हा ठीक वागू लागली. तिने सांगितले तिचा बॉयफ्रेंड दुबईला गेला. धोका टळला म्हणून मग हे दाम्पत्य पुन्हा मुळच्या घरी उपनगरात राहायला आले.

मुलगी दररोज शाळेत जायची. मात्र, घरात बोलणं बंद. तिच्या तिच्या कोशातच असायची. ती दररोज संध्याकाळी बाहेर जायची. तो मुलगा इथे नाही म्हणून आईवडल काहीसे निर्धास्त होते. एकेदिवशी या मुलीच्या आईला पेन हवा होता म्हणून तिने त्या मुलीचे दप्तर उघडले, तर त्यामध्ये रॅप केलेला बुरखा, इम्पोर्टेड अत्तर आणि सुरमा त्याचबरोबर हजारो रूपयांच्या नोटा सापडल्या. आईने त्या मुलीला या संदर्भात विचारल्यावर तिचे म्हणणे ”तुला कोणी बॅग तपासायला सांगितली? तुला जर माझं चांगलं पाहायचं असेल तर मला पासपोर्ट काढून दे. मला सौदीला जायचे आहे. तो माझी तिथे वाट बघतोय.” मुलीकडे इतके पैसे आणि इम्पोर्टेड वस्तू कुठून आल्या? कोणी दिल्या? ती दररोज बाहेर जाऊन काय करते? वाममार्गाला तर नाही लागली ना? या दाम्पत्याला मी म्हणाले, ‘’ती बाहेर जाताना तिला अडवत का नाही? तुम्ही थांबवू शकत नसाल तर आम्ही थांबवतो.

तुमची लेक ती माझी लेक.” तर त्यांचे म्हणणे की, ”ती कोणत्या नशेत असते देवजाणे, कितीही मारा तिला काही लागत नाही. तिला डांबून ठेवले तर ती प्रचंड हिंसक होते. आरडाआरेडा करते. ती अशी वाईट वागते, हे शेजार्‍यांना कळायला नको. त्यापेक्षा आम्ही तिला जिथे जायचे तिथे जा, पण सुरक्षित घरी ये, असे सांगतो. ती बाहेर असेपर्यंत आमचा जीव टांगणीला असतो.” तिला सुधारगृहात ठेवूया, असे तिच्या आईबाबांना सांगितले, तर त्यांचे म्हणणे, ”नको आमची लाडकी लेक आहे. तिचे काय होते ते आमच्या डोळ्यांसमोरच होऊ दे.” ‘लव्ह जिहाद’विरोधात काम करणार्‍या हिंदुत्ववादी संघटना आणि कार्यकर्ते या पालकांना सर्वतोपरी मदत करायला तयार आहेत, पण पालक तयार नाहीत. त्यांचे म्हणणे, गावकी भावकीला कळले तर? त्यापेक्षा नकोच! ही घटना आपल्या मुंबईतली आहे आणि गेल्या काही आठवड्यांपूर्वीची.

या परिक्षेपात अ‍ॅड. सुधा जोशी यांनी हाताळलेले एक प्रकरण सांगणे क्रमप्राप्त आहे. घटना कल्याण महाराष्ट्रातली आहे.एक हिंदू युवती होती. वडिलांनंतर अनुकंपा तत्वावर ती त्यांच्या जागी रेल्वेत नोकरीला लागली. सर्व सुरळीत होते. पण, एक-दोन वर्षांतच कोरोना आला. ‘लॉकडाऊन’ लागला. मुलीला ‘लॉकडाऊन’मुळे रजा मिळाली. याच काळात ती मित्र-मैत्रिणींना भेटू लागली. तिच्या मित्रपरिवारात एक सामायिक मित्र होता. त्याच्या आईचे ब्युटीपार्लर आणि वडील लंडनला राहायचे असे त्यांचे म्हणणे. या मुलाशी हिंदू युवतीची ओळख झाली. पुढे या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. त्या मुलाने सांगितले की, त्याचे एका हिंदू डॉक्टर मुलीवर धर्माचे कारण सांगत त्याच्या प्रेमाला धोका दिला. त्यामुळे त्या दुःखात मी अमली पदार्थ घेतो. माझी खरी मैत्रीण म्हणून तूच मला या दुःखातून बाहेर काढू शकशील. मुलीने तयारी दर्शवली. पण, पुढे या मुलीलाही अमली पदार्थांचे व्यसन लागले. याच काळात या युवतीने मुलासाठी स्वतःच्या खात्यातून १९ लाख रुपयांचे कर्ज घेतले. या मुलासाठी बँक हप्त्यातून दोन, चारचाकी वाहने आणि एक बाईक या मुलाच्या भावासाठी घेतली. तिचा पूर्ण पगार कर्जाच्या हप्त्यात जाऊ लागला. घरातल्यांना तिने सांगितले की, ‘लॉकडाऊन’मुळे पगार मिळत नाही.

घरातल्यांना सत्य समजले. हे मुलाला कळताच त्याने त्या मुलीसोबत कल्याणच्या झोपडपट्टीत निकाह लावला. त्याचा व्हिडिओ तयार केला आणि मुलीच्या घरच्यांना पाठवला. तो त्या मुलीकडून हवे ते करून घेत होता. कारण, त्याने तिला अमली पदार्थांचे व्यसन लावले होते आणि ती पूर्णतः त्याच्या आहारी गेली होती. घरातल्यांनी मुलगी या जाळ्यातून सुटावी म्हणून खूप विचार केला. त्यांनी या मुलाला सांगितले की, ही मुलगी अनुकंपा तत्वावर नोकरी करते. तिच्या कामात आम्ही सांगू की, या मुलीने लग्न केले आणि ती तिच्या घरच्यांना पाहत नाही. तिची नोकरी सुटली तरी चालेल. हा निरोप कळताच या मुलाने त्या युवतीला तिच्या परिसरात आणून सोडले. कारण, तिची नोकरी गेली, तर पगार मिळणार नाही, मग ती मुलगी काय कामाची, असा त्याने विचार केला. ती आली तेव्हा तिच्यावर नशेचा इतका अंमल होता की, ती नीट उभीदेखील राहू शकत नव्हती. पुढे कायदेशीर तक्रारी झाल्या. मुलीची फसवणूक, नशेचा व्यवहार, जबरदस्ती विवाह आणि धर्मांतर वगैरे हा मुद्दा होताच. मात्र, हा मुलगा सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला आहे. तिचा विवाह आणि धर्मांतर नशेच्या अमलात झाले, हे न्यायालयात सिद्ध करायचे आहे. त्यानंतर त्या मुलाला सजा होणार!

असा. दुसर्‍या बाजूने या ‘ड्रग्ज जिहाद’ची एक काळी बाजू आहे. ती अशी की, या अतिशय घाणेरड्या धंद्यात अडकलेल्या लोकांना त्यांच्या कौममध्ये काही लोक थारा देत नाहीत. नशा हराम आहे, असे असताना हे नशा विकतात म्हणून त्यांना कमी लेखतात. पण, ‘लव्ह जिहाद’ किंवा धर्मांतरण याबाबत या काही लोाकंचे मत सार्वत्रिकच असते. ते काही ‘हराम’ नसते. मग नशेचा व्यापार करणारे लोक त्यांच्या कौममधल्या त्या प्रस्थापित लोकांनी त्यांना मान द्यावा, सन्मान द्यावा, या लोकांनी आपले नेतृत्व मान्य करावे म्हणून काय करतात, तर ‘लव्ह जिहाद’ किंवा धर्मांतरणच्या घटनांमध्ये दोषी असलेल्या गुन्हेगारांना सोडवण्यासाठी सर्वतोपरी आर्थिक मदत करतात. मोठ्यातला मोठा वकील नेमून देतात. त्यांना अगदी सगळीच मदत करतात. आता हेसुद्धा काही हवेत लिहीत नाही. तर उपनगरामध्ये एक अशीच घटना घडली. जैन समाजातली सुशिक्षित, सुंदर युवती एका बेरोजगार मुलासोबत पळून गेली. सोबत आईचे लाखो रूपयांचे दागिने घेऊन गेली. ज्याच्यासोबत पळून गेलेली तो गुन्हेगार. त्याच्यावर आधीच गुन्हे दाखल आहेत. त्या मुलीच्या आईवडिलांनी चोरीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोघांना शोधले. मुलगी न्यायालीयन कस्टडीत आहे.

दागिन्यांबद्दल ती चकार शब्द उच्चाारत नाही. मात्र, ‘मेरा वो वैसा नही हैं’ तिचे पालुपद सुरूच आहे. तिच्याकडे लाखो रूपयांचे दागिने नाहीतच, मग ते कुणाकडे आहेत? बरं, मिडी जिन्स घालणारी ती अतिसुंदर युवती आत पोलीस कस्टडीतही हिजाब घालण्यासाठी उत्सुक आहे. तिचा तो नवरा फरार आहे आणि तिची कोर्टात तारीख असताना तिला भेटण्यासाठी तिचा तो तथाकथित सासरा येतो. येताना तिला खाण्यासाठी वडापाव घेऊन येतो. श्रीमंत घरची श्रीमंत पोरगी. चांगलेच चवदार अन्न खायची. रस्त्यावरचा वडापाव, मिसळ वगैरेंकडे ती ढुंकूनही पाहायची नाही. मात्र, त्याने आणलेला वडापाव ती मुकाट खाते. तिचे आईवडीलही तिला भेटायला येतात. मात्र, आईवडिलांनी घरून आणलेले अन्नही ती नाकारते.

प्रत्येक भेटीत तिचा तो तथाकथित सासरा मुलीच्या वडिलांना म्हणतो, ‘’अरे कायकू रोता हैं? मेरी बहु हैं, हमने बडे से बडे वकील की हैं. तेरे आख के सामने तेरे लडकी कू छुडाके बहु बनाके घर मे रखुंगा.’ मुलीला एकवेळचे चांगले अन्नही देऊ न शकणारा तो मुलीसाठी महागडा वकील कुठून करतो? तर त्याला वकील पुरवणारे आणि त्याचा सगळा खर्च करणारे कोणी तरी दुसरेच आहेत. कौममध्ये इज्जत वाढावी म्हणून ते हा खर्च करत आहेत म्हणे. हे तिच्या पालकांना माहिती आहे. मात्र, याबाबत सविस्तर बोलायला ते तयार नाही. त्यांचे नावही घ्यायला ते कचरत आहेत. ‘लव्ह जिहाद’ व्हाया ‘ड्रग्ज जिहाद’ व्हाया ‘लस्ट जिहाद’चा हा प्रवास प्रचंड वेदनादायी आणि संतापजनक आहे. हिंदू समाजाने खरेच जागृत होऊन याविरोधात एकजुटीने लढा देण्याची गरज आहे. ज्यांच्यासोबत अशा घटना घडत आहेत, त्यांनी इज्जत किंवा लोक काय म्हणतील, याची पर्वा न करता समाजात यासंदर्भात वाच्यता करायला हवी. समाजात खरचे धर्मशील, शूर लोक आहेत की ते पीडितांना मदत करतीलच करतील. ‘लव्ह जिहाद’ व्हाया ‘ड्रग्ज जिहाद’ चिरडायलाच हवा!

केरळ राज्यामध्ये जिहादी मुसलमान इसाई युवक-युवतींना ड्रग्जचे शिकार बनवत आहेत. हा एक प्रकारचा ‘नार्कोटिक्स जिहाद’ आहे. कट्टरपंथी जिहादी आईसक्रीम पार्लर, हॉटेल आणि ज्यूस सेंटरचा वापर करत गैर-मुसलमानांना नशेचे आदी बनवून बिघडवत आहेत. (बिशप जोसेफ कल्लारंगट, सिरो-मालाबार कॅथोलिक चर्च)
 
कट्टरपंथीयांच्या मदरसा आणि मशिदींना अमली पदार्थांचे गोदाम बनवून देशामध्ये अमली पदार्थ विकले जात आहेत. संपूर्ण देशात हिंदू बेरोजगार युवक ते शाळेतील मुल आणि हिंदू समाजाच्या वस्तीमध्ये हिंदू समाजाच्या धार्मिक क्षेत्राच्या आसपास अमली पदार्थ विकले जातात. त्याद्वारे हिंदू समाजाची नवी पिढी नशेच्या जाळ्यात अडकून त्यांचे भविष्य आणि अस्तित्व हरवेल.
जितेंद्र नारायण सिंह त्यागी (पूर्वाश्रमीचे वसीम रिझवी)


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.