भारताच्या परकीय चलन साठ्यात घसघशीत वाढ!

    23-Jun-2023
Total Views | 425
india forex dollar
 
नवी दिल्ली : भारताच्या परकीय चलन साठ्यात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, १६ जून २०२३ रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलनाचा साठा २.३५ अब्ज डॉलर्सने वाढून ५९६.०९ अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे.
 
मागच्या आठवड्यात परकीय चलनाचा साठा ५९३.७४ अब्ज डॉलर्स इतका होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने परकीय चलनाच्या साठ्याची आकडेवारी जाहीर केली आहे. आरबीआयच्या आकडेवारीनुसार, परकीय चलनात २.३५ अब्ज डॉलर्सची वाढ झाली असली तरी या काळात सोन्याच्या साठ्यात घट झाली आहे.
 
सोन्याचा साठा ३२४ दशलक्ष डॉलर्सने कमी होऊन ४५.०४ अब्ज डॉलर्सवर आला आहे. भारताने परकीय चलनाची आतापर्यंतची सर्वोच्च पातळी ऑक्टोबर २०२१ मध्ये गाठली होती. त्यावेळी परकीय चलन साठा ६४५ अब्ज डॉलर्सवर पोहोचला होता.
 
२०२२ मध्ये, डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाल्यानंतर, आरबीआयला डॉलर विकावे लागले, ज्यामुळे परकीय चलनाच्या साठ्यात घट झाली. परकीय गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे परकीय चलनाचा साठा ५२५ अब्ज डॉलर्सवर आला होता. मात्र, विदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्यामुळे परकीय चलनाच्या साठ्यात वाढ झाली आहे.
 
  
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121