चीनला मागे टाकत भारत बनणार सर्वात मोठा मोबाईल फोन निर्यातदार!

    23-Jun-2023
Total Views | 167
smartphon
 
नवी दिल्ली : भारतात मोबाईल फोनचे उत्पादन ज्याप्रकारे वेगाने वाढत आहे, ते पाहता लवकरच भारत जगातील सर्वात मोठा निर्यातदार होईल. चालू आर्थिक वर्षात भारतातील मोबाइल फोनची निर्यात एक लाख कोटी रुपयांच्या पुढे जाऊ शकते. आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील पहिल्या दोन महिन्यांत मोबाईल फोनची निर्यात १२८ टक्काने वाढली आहे.
 
गेल्या आर्थिक वर्षात भारताने ९०,००० कोटी रुपयांची मोबाईल फोन निर्यात केली आहे. पण यावर्षी मोबाईल फोन निर्यात १२०,००० कोटी रुपयांचा टप्पा गाठू शकते. मे महिन्यात, अॅपलने भारतातून १०,००० कोटी रुपयांचे आयफोन निर्यात केले. भारत सध्या यूएई, यूएस, नेदरलँड्स, यूके आणि इटलीला मोबाईल फोन निर्यात करत आहे.
 
लवकरच आणखी मोबाईल फोन निर्माता कंपन्या देखील भारतात गुंतवणुक करण्यास उत्सुक आहेत. अमेरिका आणि चीनमधील वाढत्या तणावामुळे मोबाईल फोन निर्माता कंपन्या आपले उद्योग चीनमधून दुसऱ्या देशात शिफ्ट करत आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121