मुलुंडमध्ये लव्हजिहाद: मोहम्मद फैजानने धर्मांतर करुन मुलीला नेले पळवुन!
15-Jun-2023
Total Views | 566
मुलुंड : मुलुंड पश्चिम येथे "द केरळ स्टोरी" सारखी घटना घडली आहे. यासंबंधी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. २६ वर्षीय मोहम्मद फैजान हा प्रयागराज (अलाहाबाद) उत्तर प्रदेश येथे राहत असुन तो कॅपिटल मार्केटशी संबंधित एक वर्षाचा अभ्यासक्रम शिकण्यासाठी ठाणे येथे आला होता. फैजानने दि. १४ जून रोजी मुंबई येथील २१ वर्षीय जैन हिंदू मुलीला घेऊन पळून गेला आहे,
यासंदर्भात ट्विट करत किरीट सोमय्या म्हणले, "मुलुंड पश्चिम येथे "द केरळ स्टोरी" सारखी घटना. २६ वर्षीय मोहम्मद फैजान (राहणार प्रयागराज (अलाहाबाद) उत्तर प्रदेश) काल दुपारी मुलुंड मुंबई येथील २१ वर्षीय जैन हिंदू मुलीला घेऊन पळून गेला. कॅपिटल मार्केटशी संबंधित एक वर्षाचा अभ्यासक्रम शिकण्यासाठी मोहम्मद ठाणे (मुंबई) येथे आला होता. गेल्या काही महिन्यात मुलीला फसविले, पळविले. आज बुरखा मधील फोटो मुलीचा आईला पाठविला... मुली सोबत तो उत्तरप्रदेश येथे आहे असे पोलिसांना वाटते." अशी माहिती सोमय्यांनी दिली.