नाशिक : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे ऑनलाइन गेमिंगद्वारे अल्पवयीन मुलांचे धर्मांतर करण्याचे प्रकरण ताजे असतानाच आता नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्येही करिअर गाईडन्सच्या नावाखाली विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षण तसेच धर्म परिवर्तनाचे धडे जात असल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी घडला. याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र घटनास्थळी जात हा प्रकार हानून पाडला. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यास पोलिसांनी दिरंगाई केल्याने संतप्त पालकमंत्री दादा भुसे यांनी पोलीस स्थानकात दाखल होत पोलीस प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
सविस्तर माहिती अशी की, मालेगावच्या एमएसजी महाविद्यालयात पुण्याच्या सत्य मलिक लोक सेवा ग्रुपतर्फे भारतीय छात्र(एनसीससी) व इतर विद्यार्थ्यांसाठी करिअर गाईडन्स कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये एनडीए बद्दल करियर मार्गदर्शन आणि रोजगारच्या संधी याबद्दल माहिती देण्याच्या नावाखाली प्रमुख्य व्याख्यात्यांनी प्रथम कुराणमधील कलमा व आयती वाचून दाखवत इतर धर्मीय मुलांनाही मुस्लिमांप्रमाणे शिक्षण घेण्याचे आमिष दाखवून धर्म परिवर्तन करण्यासाठी खोटी प्रलोभने दाखवण्यास सुरुवात केली.
या प्रकरणाची माहिती मिळताच तत्काळ हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते कार्यक्रमस्थळी दाखल झाले. धर्मपरिवर्तनासाठी दिले जात असलेले धार्मिक शिक्षणाचे प्रकार आणि त्यांचे पूढील मनसुबे हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावले.ही घटना दुपारी साडेबारा वाजता घडली. मात्र मालेगाव पोलिसांनी पोलिस स्टेशनमध्ये रविवारी रात्रीचे साडे नऊ वाजेनंतर गुन्हा नोंदवला.
दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाले ”जर घटना दुपारी साडेबारा वाजता घडली तर त्याचा गुन्हा नोंदवण्यास पोलिसांनी विलंब का केला’ असा सवाल उपस्थित करत पालकमंत्री दादा भुसे यांनी पोलिस स्टेशनमधील अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले.
या घटनेचे चित्रीकरण आयोजकांकडूनच करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनीही आमच्या कडून धार्मिक शिक्षणासारखे कृत्य करुन घेतल्याचे मिडीयासमोर कबूल केल्यानंतरही करियर मार्गदर्शन स्थळी असे काही झालेच नाही असे खोटे जवाब विद्यार्थ्यांकडून बळजबरीने लिहून घेतले गेले, अशी माहिती दादा भुसे यांनी दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना व्यक्त केली. दरम्यान, दोषींची सखोल चौकशी करुन त्यांच्यावर आरोप नोंदवून कडक कारवाई करावी, अशी मागणी दादा भुसे यांनी केली आणि विलंबाबद्दल अधिकार्यांना खडे बोल सुनावले.
कार्यक्रमा विना परवानगी, दोषींवर कडक कारवाई व्हावी
येथील महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात येथे ‘एनडीए’ संबंधी करियर मार्गदर्शन मेळाव्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थीनींना बोलण्यात आले. ‘एनडीए’मध्ये देशासाठी सेवा देणार्या सैनिकानां तयार करणारे शिक्षण दिले जाते. तिथे जात पंथ, धर्म याचे शिक्षण कधीच दिले जात नाही. मग करियरच्या नावाखाली येथे विद्यार्थ्यांना मुस्लीम धर्मियांच्या धार्मिक शिक्षणाचे धडे का दिले गेले.? हा कार्यक्रमच परवाणगी कुणी दिली. काही धर्मियांच्या विद्यार्थ्यांना बाहेर ठेऊन केवळ हिंदू धर्मिय विद्यार्थ्यांना येथे आत बसवून धार्मिक शिक्षण का दिले जात होते.केरळ, उत्तर प्रदेश आदी बाहेरील राज्यातील 30 ते 40 मुस्लीम कट्टरवाद्यांनी त्यांचे श्रद्धी, धार्मिक कार्यपद्धती यावर धार्मिक धडे देण्यास सुरुवात केली. यातील सर्व बाहेरचे होते. करियच्या नावाखाली असे धार्मिक शिक्षण, धर्मांतराची तयारी करणार्यांवर कडक कारवाई करावी.- दादा भुसे (बंदरे आणि खनीकर्म मंत्री तथा नाशिक जिल्हा पालकमंत्री )
विद्यार्थ्यांवर दबाव अन् पोस्टर, बॅनरमधून धर्मशिक्षण
कार्यक्रम स्थळी धार्मिकतेचे जाहीर प्रगटन करणारे पोस्टर, बॅनर लावण्यात आले होते. त्यावर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेत कार्यक्रम उधळूण लावला. विशेष म्हणजे करियर मार्गदर्शन कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांनी करियरच्या नावाखाली आत धार्मिकतेचे धडे, प्रलोभने दिले जात असल्याचे वास्तव आपल्या जवाबात पोलिस आणि माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर मांडले. असे असतानाही आयोजकांनी ‘आत कार्यक्रमात असे काही घडलेच नाही’ असे जवाब विद्यार्थ्यांकडून बळजबरीने लिहून घेण्यास सुरुवात केली आणि विद्यार्थ्यांवर दबाव टाकण्याच प्रयत्न केला.