सुषमा अंधारेंनी लाटल्या वारकऱ्यांसाठी पोळ्या! आधी उडवली होती वारीची खिल्ली!
12-Jun-2023
Total Views | 225
मुंबई : आधी वारकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या सुषमा अंधारेंनी वारकऱ्यांसाठी पोळ्या लाटल्या आहेत. आषाढी वारी २०२३ साठी वारकऱ्यांच्या हरिनामाच्या गजरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचा पालखींचे आज १२ जून रोजी पुणे शहरात आगमन झाले. यादरम्यान पालखी सोहळ्यात उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील दिंडीत पंगत सेवा दिली.
मात्र, यापुर्वी सुषमा अंधारेंनी वारकरी संप्रदायासाठी अपशब्द वापरले होते. अंधारेंची हकालपट्टी करा. अशी मागणी देखील वारकऱ्यांनी केली होती. संतांनी रेड्याला शिकवलं. पण माणसांना कुठं शिकवलं, असं वक्तव्य सुषमा अंधारे यांनी आपल्या एका जुन्या व्हीडिओमध्ये केलं होतं. यावरून वारकरी संतप्त झाल्याचं दिसून आलं. राजकारण राजकारणाच्या बाजूला ठेवावं. ही टीका योग्य नसल्याचं वारकऱ्यांचं म्हणणं होतं. आळंदीत वारकऱ्यांनी अंधारेंच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी अंधारेंची प्रतिकात्मक अंत्ययात्राही काढली होती.