अरविंद केजरीवाल यांच्या '१७८ कोटी रुपयांच्या शीशमहल'चा व्हिडिओ व्हायरल
11-Jun-2023
Total Views |
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या १७८ कोटी रुपयांच्या शीशमहलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. या व्हिडीओत लोक पास्टरसोबत फोटो घेताना दिसत आहेत. भाजपने 'सेल्फी विथ करप्शन पॅलेस' अभियान असे नाव दिले आहे. दिल्ली भाजप प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी लिहिले, "आज कॅनॉट प्लेसमध्ये आम्ही सेल्फी विथ करप्शन राजमहल मोहिमेची सुरुवात केली आहे. या मोहिमेद्वारे आम्ही जनतेसोबत केजरीवाल यांचा भ्रष्टाचार आणि घराणेशाहीचा पर्दाफाश करू, असंही सचदेवा म्हणाले आहेत.
दरम्यान, यापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निवासस्थान शीशमहल या नावाने चर्चेत होते. भाजपने ४५ कोटी रुपये खर्च करून नूतनीकरण केलेल्या घराला भ्रष्टाचाराचा महाल म्हटले आहे. या निवासस्थानाचे एक छोटेसे मॉडेल कॅनॉट प्लेसमध्ये बनवण्यात आले असून त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. भाजपने लोकांना त्याच्यासोबत सेल्फी पोस्ट करण्यास सांगितले आहे. भाजपने याला 'सेल्फी विथ करप्शन पॅलेस' अभियान असे नाव दिले आहे.
भाजप दिल्लीने या संदर्भात म्हणाले की, अरविंद केजरीवाल सरकारचा भ्रष्टाचार उघड करण्यासाठी दिल्ली भाजप एक नवीन राजकीय मोहीम सुरू करत आहे. भाजप नेते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी लिहिले की, "आता तुम्ही भ्रष्टाचाराच्या महालासोबत सेल्फी घेऊ शकता. भाजप प्रत्येक विधानसभेत जाऊन केजरीवाल यांचा भ्रष्टाचार दाखवेल, असंही ते म्हणाले.
दरम्यान, या ट्विटनंतर भाजपचे अनेक नेते राजमहलसोबत सेल्फी घेत आहेत आणि सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. दिल्लीतील नागरिकांकडूनही यास प्रतिसाद मिळत आहे. भाजपने या अभियानातून दिल्ली सरकारच्या भ्रष्टाचारावर बोट ठेवले आहे. रामवीर सिंह बिधुरी यांनी लिहिले, “सरकारी सुविधा न घेण्याच्या बहाण्याने सत्तेत आलेले अरविंद केजरीवाल १७८ कोटींच्या महालात राहत आहेत. हजारो कोटींचे घोटाळे झाले आहेत. आता भ्रष्टाचाराला आणखी हक्क हवेत! कॅनॉट प्लेसमध्ये भाजपने केजरीवाल यांच्या भ्रष्टाचाराची झांकी दाखवली!, असे ते म्हणाले.