मिशन बारामती पुन्हा ऍक्टिव्ह मोडवर

पुरंदर राष्ट्रवादीचा बडा नेता भाजपच्या वाटेवर

    15-May-2023
Total Views | 639
 
pawar
 
 
मुंबई: २०२४ लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने काही निवडक मतदारसंघांवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. बड्या राजकीय घराण्यांच्या परंपरागत मतदारसंघांमध्ये भाजपचा उमेदवार निवडून आणण्याचे भाजपचे मनसुबे आहेत. त्यात शरद पवारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बारामतीवर भाजपचे विशेष लक्ष आहे. भाजपकडून घोषित करण्यात आलेले 'मिशन बारामती' पुन्हा एकदा ऍक्टिव्ह मोडवर आले असून या लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचा एक बडा नेते लवकरच भाजपात डेरेदाखल होणार आहे. त्यामुळे पवारांसमोरील आव्हान दिवसेंदिवस तगडे होत जात आहे.
 
बारामती लोकसभेतील पुरंदर तालुक्याचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक टेकवडे लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. पुण्यात गुरुवार, दि. १८ मे रोजी होणाऱ्या प्रदेश कार्यकारिणीच्या कार्यक्रमात महाराष्ट्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत टेकवडे भाजपवासी होणार आहेत. या कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. टेकवडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसची काही इतर नेतेमंडळी देखील पक्षप्रवेश करणार असून हा पवारांसाठी मोठा धक्का मनाला जात आहे.
 
''भाजप पक्षप्रवेश करण्यासाठी मी कुठलेली अट किंवा पदाची मागणी केलेली नाही. त्या पेक्षा भाजपात पक्षप्रवेश केल्याने पुरंदर तालुकात आणि मतदारसंघातील रखडलेल्या प्रकल्पांना गती देणे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील गटबाजी आणि होणारा अन्याय सहन न झाल्याने आपण हा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी न करून घेणे आणि सातत्याने अन्याय करणे या पक्षाच्या वर्तणुकीमुळे आपण भाजपात जाण्याचा पर्याय स्वीकारल्याचे टेकवडे यांनी सोमवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे.
 
टेकवडे पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार असून राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते म्हणून त्यांची प्रतिमा आहे. सुप्रिया सुळे प्रतिनिधित्व करत असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात पुरंदरचा समावेश असून त्यांना मिळणाऱ्या मताधिक्यात पुरंदरचा मोठा वाटा आहे. टेकवडे यांच्या भाजप प्रवेशामुळे पुरंदर विधानसभा आणि बारामती लोकसभेची राजकीय गणिते बदलण्याची शक्यता आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121