मुंबई : मुंबई उपनगरीय विभागात प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने अकरा अतिरिक्त १२ डब्यांच्या नॉन-एसी लोकल ट्रेन सेवांचा प्रायोगिक तत्त्वावर विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. या अतिरिक्त सेवा ५ एप्रिल २०२३ पासून सुरु होतील.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, या अतिरिक्त सेवांमुळे पश्चिम रेल्वेवरील एकूण सेवांची संख्या १३८३ वरून १३९४ होणार आहे. नव्याने सुरू करण्यात आलेल्या जलद सेवा बोरीवली आणि वांद्रे येथे प्रायोगिक तत्त्वावर थांबणार नसून त्यानुसार सध्या अस्तित्वात असलेल्या काही सेवांच्या वेळेत किरकोळ बदल करण्यात येणार असल्याचीही माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.