रेल्वे माथाडी कामगारांसाठी मंत्र्यांनी केली मोठी घोषणा

    20-Apr-2023
Total Views | 111
mathadi workers

मुंबई
: विविध रेल्वे यार्डमध्ये माथाडी बोर्डात नोंदणी असलेले कामगार मालाची चढ-उतार करतात, या कामगारांना पाणी, शेड, शौचालय, सुसज्ज विश्रांतीगृह, वीज आदी सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. विविध रेल्वे यार्डामध्ये या सुविधा देण्यासंदर्भात तातडीने क्रियाशील आराखडा सादर करावा. माथाडी कामगारांचे प्रलंबित वेतन तातडीने वितरीत करण्याच्या सूचना कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी केल्या.

रेल्वे यार्डात माथाडी कामगार व अन्य घटकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने रेल्वे प्रशासनातील अधिकारी व अन्य अधिकाऱ्यांसोबत आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना देताना मंत्री खाडे बोलत होते. या बैठकीत कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, अपर कामगार आयुक्त शिरीन लोखंडे, महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे अधिकारी पोपटराव देशमुख यांच्यासह अन्य ११ माथाडी कामगार संघटनेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

मंत्री खाडे म्हणाले की, विविध ११ कामगार व माथाडी संघटनांच्या मागण्या प्राप्त झाल्या आहेत. सर्व रेल्वे यार्डात माथाडी कामगारांसाठी अंतर्गत रस्ते व धक्क्यासाठी येणारा रोड सुस्थ‍ितीत तयार करून देणे. कामगारांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुसज्ज शौचालय, धक्क्यावर कायमस्वरूपी शेड, विद्युत सेवा, विश्रांतीगृह, जुन्या रस्त्यावरील खड्डे भरण्यात यावे.

तसेच, माल उतरवताना रेल्वे आणि प्लॅटफॉर्म मध्ये अंतर फार असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे, यावर पर्याय म्हणून लोखंडाच्या पायरीचा वापर करण्यात यावा. संबंधीत कामे तातडीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने रेल्वे विभागाने तातडीने आराखडा तयार करून सादर करावा. मानवतेच्या दृष्टीकोनातून माथाडी कामगारांचा विचार करून त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या. त्यांचे प्रलंबित वेतन तातडीने अदा करण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सुचनाही संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या, असे मंत्री खाडे यांनी यावेळी सांगितले.

अग्रलेख
जरुर वाचा
पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार ९ हजार अश्वशक्ती इंजिनाचे राष्ट्रार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार ९ हजार अश्वशक्ती इंजिनाचे राष्ट्रार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ आणि २७ मे रोजी गुजरात दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी दाहोद येथे स्थापन झालेल्या रेल्वे उत्पादन युनिटमध्ये उत्पादित केलेल्या पहिल्या ९ हजार अश्वशक्तीच्या लोकोमोटिव्ह इंजिनचे उद्घाटन करतील. पीपीपी मॉडेल अंतर्गत स्थापन झालेला दाहोद येथील रेल्वे कारखाना पुढील १० वर्षांत १,२०० इंजिन तयार करणार आहे, ज्याची देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्यात करण्याची योजना आहे. १०० टक्के मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत लवकरच ही लोकोमोटिव्ह इंजिने पूर्णपणे तयार केली जातील...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121