मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपासोबत जाणार असल्याच्या चर्चाना पूर्णविराम दिला. यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊतांचा नामोल्लेख न करता त्यांना फटकारलं. यावर, मी फक्त शरद पवारांचं ऐकतो. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, असा पलटवार राऊतांनी केला आहे.
अजित पवारांना पलटवार करताना राऊत म्हणतात, "राष्ट्रवादी फुटीच्या चर्चेला मी जबाबदार नाही. शरद पवारांची भूमिका आमच्यासाठी महत्त्वाची आहे. मी फक्त शरद पवारांच ऐकतो. अजित पवारांवरून भाजप बॅकफूटवर पडली. मी मविआचा चौकीदार आहे. सेनाफुटीनंतर तुम्हीही आमच्यावर बोललात. राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपचा डाव आम्ही उघडा केला. वकिलीचं खापर माझ्यावर का फोडता?"
"फोडण्याचं कारण काय शिवसेना फुटली तेव्हा तुम्हीदेखील वकिली करत होता. ते आमच्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे की, आपल्या बरोबरचा घटक पक्ष मजबूत रहावा आणि त्याचे लचके तुटले जाऊ नयेत. अनिल देशमुख असतील जितेंद्र आव्हाड असतील अशी किती जणांची नावं आहेत की त्यांच्यावर यंत्रणांचा दबाव आहे. जे सत्य आहे ते मी लिहत राहणार आणि बोलतच राहणार." असं राऊत म्हणाले.