छ. संभाजीनगरमध्ये दोन गटात पुन्हा दगडफेक!

    31-Mar-2023
Total Views | 133
stone-pelting-in-two-groups-at-ohar-village-in-sambhaji-nagar

संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील कराडपुरमधील घटना ताजी असतानां छ. संभाजीनगरमधील ओहर गावात दि. ३१ मार्च रोजी दोन गटात जोरदार राडा झाला आहे. यावेळी दगडफेक झाल्याची माहिती समोर येत आहे.या दगडफेकीत दहा जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गावात सीआरपीएफ जवानांसह पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र कोणत्या कारणावरून दगडफेक झाली हे अद्याप अस्पष्ट आहे.

ओहर गाव हे छत्रपती संभाजीनगरपासून १० किलोमीटरच्या अंतरावर आहे. अज्ञात कारणावरून राडा झाला असून थोड्याचवेळात दगडफेकही झाली. सध्या याठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आहे. तसेच, परिसरात शांततापूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.या घटनेत जखमी झालेल्यांना छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलेले आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121