'माझ्या एरियात राहायचे नाही...'; वयोवृद्ध व्यक्तीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा धक्कादायक प्रकार उघड!

    04-Jul-2024
Total Views |

Chhatrapati Sambhajinagar

मुंबई (प्रतिनिधी) :(Chhatrapati Sambhajinagar Crime Case) 
एका वयोवृद्ध व्यक्तीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर येथे घडला आहे. महिपालसिंग गौर नामक या वयोवृद्ध व्यक्तीची काही तरुणांनी बाचाबाची झाली होती. मात्र या वादामुळे तरुणांनी 'माझ्या एरियात राहायचे नाही' असे धमकावत वृद्ध व्यक्तीवर चक्क पेट्रोल ओतून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.

हे वाचलंत का? : इंस्टाग्रामच्या माध्यमातून मुलींची फसवणूक! लाखोंचे दागिने लंपास; आरोपी मोहम्मद अजमल पोलिसांच्या ताब्यात

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील शहाणूर मिया दर्गा परिसरात संपूर्ण प्रकार घडला आहे. यात वृद्ध व्यक्ती गंभीररित्या भाजली असून सध्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्याच्या आधारे संभाजीनगर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. आदिल शेख, कृष्णा शिंदे आणि शेख अयाज अशी आरोपींची नावे आहेत. अटक केलेल्या आरोपींविरोधात यापूर्वीही विविध पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले होते.